आरोग्य व शिक्षणनगरपरिषद

जळालेल्या JCB मशीन चा इन्शुरन्स संपला आहे, मुख्यधिकारी जबाबदार की, ठेकेदार ? योगेश पारगे यांचा सवाल

Spread the love

जळालेल्या JCB मशीन चा इन्शुरन्स संपला आहे, मुख्यधिकारी जबाबदार की, ठेकेदार ? योगेश पारगे
यांचा सवाल Burned out JCB machine insurance lapsed, CEO responsible or contractor? Yogesh Parge His question

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १२ जानेवारी.

दोन दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची मालमत्ता असणारा जेसीबी जळून खाक झाल्यामुळे नागरिकांच्या कष्टाच्या व घामाच्या पैशांचा असा राजरोसपणे नाश होणे हे बेजबाबदार प्रशासकाचे लक्षण असल्याचे मत तळेगाव दाभाडे काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष योगेश पारगे यांनी व्यक्त केले आहे. सदर जेसीबी मशीन हे अशोक इंटरप्राईजेस या कचरा कॉन्ट्रॅक्टरला भाडेतत्त्वावर वापरण्यास दिले होते माहितीनुसार सदर जेसीबी मशीन ची किंमत 25 लाखांच्या घरात आहे, एवढ्या मोठ्या किमतीची मालमत्ता वाहन स्वरूपात असताना देखील त्याचा इन्शुरन्स रिन्यू करण्याची नामुष्की नगर प्रशासनाला भोगावी लागणार आहे. अशोक इंटरप्राईजेस बरोबर झालेल्या करारात इन्शुरन्स बाबतचा कुठलाही उल्लेख स्पष्टपणे नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सदर मालमत्तेचे नुकसान कोण भरून देणार याबाबत नगर परिषद प्रशासनाने खुलासा करणे गरजेचे आहे असे मत योगेश पारगे यांनी व्यक्त केले आहे.
एवढा मोठा प्रमाणात नगरपरिषदेच्या ट्रॅक्टर डंपर ट्रॉली तसेच जेसीबी मशीन असताना यांना पार्किंगकरण्यासाठी जागा मिळू नये ही हास्यास्पद गोष्ट आहे.

तसेच एवढ्या मोठ्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सिक्युरिटी गार्डची तसेच सीसीटीव्हीची व्यवस्था नाही ही देखील खेदाची बाब आहे असे पारगे यांनी नमूद केले आहे.
इन्शुरन्स द्वारे सदर नुकसान भरून निघाले असते परंतु इन्शुरन्स रिन्यू न केल्यामुळे संपूर्ण 25 लाखांचे नुकसान झालेले आहे सदर नुकसान कोण भरून देणार याचा खुलासा नगर परिषदेने करावा अशी जाहीर विनंती योगेश पारगे यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!