आपला जिल्हालोणावळासामाजिक

लोणावळेकरांनी रेल्वे रूळावर व इंजिनवर ठिय्या मारत वीस मिनिटे दख्खनची राणी रोखून धरली

रेल्वे प्रशासनाचे अश्वासनानंतर रेल्वेसेवा पूर्ववत.

Spread the love

लोणावळेकरांनी रेल्वे रूळावर व इंजिनवर ठिय्या मारत वीस मिनिटे दख्खनची राणी रोखून धरली ; रेल्वे प्रशासनाचे अश्वासनानंतर रेल्वेसेवा पूर्ववत. Lonavlekar held back the Deccan Queen for twenty minutes by hitting the railway track and the engine; Railway services restored after assurance from Railway Administration.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर  लोणावळा प्रतिनिधी, १३ जानेवारी.

लोणावळेकरांनी रेल्वे रूळावर व इंजिनवर ठिय्या मारत वीस मिनिटे दख्खनची राणी रोखून धरली;रेल्वे प्रशासनाचे अश्वासनानंतर रेल्वेसेवा पूर्ववत होत दख्खनची राणी मुंबईला रवाना झाली.

वंदे भारत एक्सप्रेस गाडीसह पाच एक्स्पेस गाड्यांना लोणावळ्यात थांबा द्यावा , लोणावळा पुणे लोकलसेवा दुपारी ११ ते तीन दरम्यान फे-या पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी करत आज पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन (दख्खनची राणी ) ही गाडी ८ .१० वाजता लोणावळा रेल्वेस्टेशनला आली. तोपर्यत शिव छञपतीँच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांचे हस्ते पुष्पहार घालून शेकडो रेल्वे प्रवाशी व नागरिक , महिला यांनी पोलिसांचे न जुमानता रेल्वे रूळावर ठिय्या मारला. काही तरूणांनी रेल्वै गाडीपुढे तर काहींनी इंजिनवर चढून गाडी थांबवून धरत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

लोणावळा शहर व ग्रामीणचे पोलिसांचा, रेल्वेचे पोलिसांचे पथक, आरपीएफ आणि होमगार्ड असा मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त प्रथम नागरिकांना रेल्वे रोखण्यासाठी आलेले असताना अडविण्यासाठी आले असता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. माञ त्यांना ते रोखू शकले नाही, इतकी नागरिकांकडून गर्दी झाली होती.

अखेर स्टेशन मास्तर.रजपूत यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करत त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारून रेल्वे प्रशासनातर्फे आलेल्या सुचनेनुसार दुपारच्या लोकलगाड्या पुन्हा सुरू करण्यात येईल व पाच लांब पल्याच्या गाड्यांना लोणावळा रेल्वे स्टेशनला थांबा देण्यात येईल, असे अश्वासन दिल्यानंतर व पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर रेल्वे इंजिनवर चढलेले व रूळावर आलेले सर्वजण बाजूला होऊन डेक्कन क्वीन पुढे मुंबईला निघाली.
यावेळी लोकप्रतिनिधी सहभागी न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

वंदे भारत ही १५फेब्रूवारी २०१९ रोजी सुमारे चार वर्षापूर्वी दिल्ली, भोपाळ साठी धावणारी इंटरसिटी एक्स्पेस सुरू करावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!