ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमावळसामाजिक
विठ्ठल मंदीर संस्थानचे सेवक मुरलीधर ढेकणे यांचा ५ फुटाचे १००१ भगवे ध्वज अयोध्येत पाठविण्याचा संकल्प पुर्णत्वास.
ध्वज विश्व हिंदु परिषदे मार्फत उद्या अयोध्येसाठी रवाना होणार.
विठ्ठल मंदीर संस्थानचे सेवक मुरलीधर ढेकणे यांचा ५ फुटाचे १००१ भगवे ध्वज अयोध्येत पाठविण्याचा संकल्प पुर्णत्वास ; ध्वज विश्व हिंदु परिषदे मार्फत उद्या अयोध्येसाठी रवाना होणार.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १३ जानेवारी.
विठ्ठल मंदीर संस्थानचे सेवक मुरलीधर ढेकणे यांनी ३ वर्षांपूर्वी ५ फुटाचे १००१ भगवे ध्वज अयोध्येत पाठविण्याचा संकल्प केला होता. त्याची पुर्तता झाली असुन सदर ध्वज विश्व हिंदु परिषदे मार्फत उद्या अयोध्येसाठी रवाना होतील.
सदर प्रसंगी विंहिप चे प्रांत सहमंत्री सोमनाथ दाभाडे , सहकार्यवाह गौरव , तुषार , विठ्ठल मंदीर संस्थानचे यतीनभाई शहा , शामभाऊ व स्वसंसेवक बंधु व ढेकणे परिवारातील सदस्य उपस्थित होते.