मावळ

देवले ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी विकास दळवी बिनविरोध.

Spread the love

देवले ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी विकास दळवी बिनविरोध.Vikas Dalvi is unopposed as deputy sarpanch of Deole Gram Panchayat

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ११ जानेवारी.

देवले ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी विकास मारूती दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळत्या उपसरपंच जयश्रीताई गाडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात निवडणूक घेण्यात आली.
निर्धारित वेळेमधे उपसरपंच पदासाठी विकास दळवी यांचा एकच अर्ज आल्याने व तो छानणीत वैध झाल्यानंतर पीठासन आधिकारी सरपंच.वंदना बाळासाहेब आंबेकर यांनी दळवी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.यावेळी सरपंच वंदनाताई आंबेकर, सदस्य शंकर आंबेकर, सदस्या व माजी उपसरपंच जयश्रीताई गाडे, उर्मिला आंबेकर, आशाताई आंबेकर, सोनाली गायकवाड, सदस्य व माजी सरपंच महेंद्र आंबेकर यांनी आणि भाजे विकास सोसायटी चे माजी चेअरमन बाळासाहेब आंबेकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत व अभिनंदन केले.

त्यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच ; दळवी म्हणाले, सर्व सदस्य व सरपंच यांना विश्वासात घेऊन गावातील विहीरीचे पाणी आठवड्यातून एक वेळा नळाद्वारे गावात वापरण्यासाठी सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. तळ्याचे उर्वरित काम करण्यात येईल. स्मशानभूमी आरसीसी मधे बांधून घेण्यात येईल. तसेच ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची ईमारतही पूर्णपणे नवीन बांधकामाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!