आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

शैक्षणिक संकुलाच्या १०० मीटर परिसरातच गुटखा विक्री..

सिगारेट, तंबाखू, गुटख्याची विक्री जोमात असुन त्यावर कारवाई होणार का ? जागरुक पालकांची शालेय व्यवस्थापनाला मागणी.

Spread the love

शैक्षणिक संकुलाच्या १०० मीटर परिसरातच गुटखा विक्री;सिगारेट, तंबाखू, गुटख्याची विक्री जोमात असुन त्यावर कारवाई होणार का ? जागरुक पालकांची शालेय व्यवस्थापनाला मागणी. Sale of gutkha within 100 meters of the educational complex; sale of cigarettes, tobacco, gutkha is in full swing, will action be taken against it? Demand of conscious parents to school management.

आवाज न्यूज : गुलाम अली भालदार, चिंचवड प्रतिनिधी, १९ जुलै.

चिंचवड येथील प्रतिभा शैक्षणिक संकुलाची प्रतिभा इंटरनॅशनल स्कुल, प्रतिभा महाविद्यालयात सुमारे सात हजाराहून अधिक विद्यार्थी शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. पालक सभामध्ये जागरूक पालकांनी कायद्यानुसार शैक्षणिक संकुलाच्या १०० मीटर परिसरात सिगारेट, तंबाखू, गुटखा विक्री करण्यास कायद्याने बंदी असताना आपल्या संकुलाच्या गेटसमोरील टपर्‍यामधून सर्रास विक्री होत आहे.मुले व्यसनाधीन होत आहे, याला तातडीने प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी केली.

प्रतिभा शैक्षणिक संकुलाच्या गेटसमोरच दुकानातून तंबाखू, सिगारेट, गुटख्याची विक्री होत असून येथे विद्यार्थी इतर लघुउद्योगातील कामगार आदी ये-जा करणारे नागरिक खरेदी करत आहे. पालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांना होत असलेली विक्री तातडीने बंद करण्याबाबत लेखी निवेदन संस्थेच्या वतीने २३ ते २६ जुन दरम्यान दिले होते.

त्याचे प्रमुख कारण येथील शाळा, महाविद्यालयात अल्पवयीन मुले तसेच, तरूण मुले मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत असताना ते व्यसनाधिन होवू नये यासाठी संस्था आग्रही आहे. त्याची अद्यापपर्यंत कोणतीच उचीत कारवाई झाली नाही. तरी संस्थेसमोरील दुकानाची तपासणी करून गुटखा, तंबाखू, सिगारेट विक्री करणार्‍यांवर कायमस्वरूपी विक्री बंद करण्यासंदर्भात उचित कारवाई करावी, अशी लेखी मागणी दिलेल्या निवेदनात संस्थेच्या वतीने केली आहे. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!