आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

अजित गव्हाणे अध्यक्ष, तर राहूल भोसले, शाम लांडे, जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, फजल शेख कार्याध्यक्ष..

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी  निवडीचे पत्र दिले.

Spread the love

अजित गव्हाणे अध्यक्ष, तर राहूल भोसले, शाम लांडे, जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, फजल शेख कार्याध्यक्ष..Ajit Gavane is the President, while Rahul Bhosle, Sham Lande, Jagdish Shetty, Prashant Shitole, Fazal Shaikh are the working presidents.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, १९ जुलै.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी निवडीचे पत्र दिले. यावेळी राहूल भोसले, शाम लांडे, जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, फजल शेख यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडी सुरू केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. शहरातील राष्ट्रवादीच्या बहुतांशी सर्वच आजी-माजी नगरसेवकांनी अजित गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली अजित पवार यांना पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केल्या आहेत. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, राहूल भोसले, शाम लांडे, प्रभाकर वाघेरे, प्रसाद शेट्टी व इतर मान्यवर उपस्थित होते.

अजित गव्हाणे यांच्याकडेच शहराध्यक्षपदाची धुरा सोपविल्याने राष्ट्रवादीला नव्याने उभारी घेण्यास तसेच अजित पवार गटाची ताकद शहरात वाढविण्यास मोठी मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून शहर विकासाची अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल. पिंपरी-चिंचवडकच्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू. असे अजित गव्हाणे यांनी या वेळी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!