आपला जिल्हाराजकीय

वडगाव मधील वाहतूक समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी शहर भाजपा चे पोलीस स्टेशनला निवेदन.

Spread the love

वडगाव मधील वाहतूक समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी शहर भाजपा चे पोलीस स्टेशनला निवेदन.City BJP’s statement to police station to control traffic problems in Vadgaon.

आवाज न्यूज मावळ प्रतिनिधी, २० जुलै.

वडगावमध्ये नव्याने रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले असल्यामुळे रस्ता काही भागात रुंद स्वरूपाचा झाल्याने, त्याचा गैरफायदा वाहन चालक घेताना दिसत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून स्मशानभूमी लगत दुतर्फा कायम स्वरूपी वाहने रस्त्यावर अवैधरित्या उभी केलेली आहेत ती हटविण्याबाबत वडगाव शहर भाजपा ने पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक. कुमार कदम यांना निवेदन दिले आहे.

यामध्ये नागरिकांची समस्या मांडताना,सदर स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी, दशक्रिया विधी यावेळेस बाहेरून येणारे वाहनांना पार्किंग सुविधा असून अडचण निर्माण होत आहे, त्या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजूला अवैधरित्या काही वाहने “कायमस्वरूपी” उभी केली असल्याचे दिसून येत आहे.

शाळेला जाणारी मुले, बाजारात येणाऱ्या महिला भगिनीं आणि बाजूला मारुती मंदिरात येणारे भाविक,जेष्ठ नागरिक तसेच टू व्हीलर वरून प्रवास करणारे सर्वच यांना या गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आणि एखादा मोठा अपघात सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून काही दिवसापूर्वी नगरसेवक रविंद्र म्हाळसकर यांनी या विषया संदर्भात वडगाव नगरपंचायत ला सुद्धा या विषयी कारवाई व्हावी म्हणून निवेदन दिले होते.

त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसल्याने आम्ही वडगाव शहर भाजपा आपलेकडे या संदर्भातील निवेदन देत आहोत,आपण या सर्व गोष्टींची गंभीर दखल घेऊन संबंधित कायमस्वरूपी उभ्या असणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात यावी असे शहर अध्यक्ष अनंता कुडे यांनी निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी मा. जि. प. सदस्य चंद्रशेखर भोसले, मा. सभापती गुलाबराव म्हाळस्कर, मा. उपसभापती, नगरसेवक प्रविण चव्हाण, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, युवा मोर्चा अध्यक्ष. विनायक भेगडे,भाजपा. चे संघटन मंत्री किरण भिलारे, नगरसेवक, किरण म्हाळस्कर,रविंद्र म्हाळस्कर,ॲड विजयराव जाधव,खंडूशेठ भिलारे, अतुल म्हाळसकर, प्रशांत चव्हाण आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!