आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

लहान,मोठ्यांच्या उपस्थितीत, प्रसन्न वातावरणात,दिव्यांच्या झगमगाटात कलापिनीचे मांगल्याचे आणि संस्काराचे दिप पूजन संपन्न..

कलापिनी बालभवन स्वास्थ्य योग आणि महिला मंच यांचा एकत्रित दीपपूजनाचा कार्यक्रम प्रसन्न वातावरणात साजरा झाला.

Spread the love

लहान,मोठ्यांच्या उपस्थितीत, प्रसन्न वातावरणात,दिव्यांच्या झगमगाटात कलापिनीचे मांगल्याचे आणि संस्काराचे दिप पूजन संपन्न….In the presence of young and old, in a pleasant atmosphere, in the glow of lamps, Kalapini’s Mangal and Sanskar’s lamp pooja is complete….

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २० जुलै.

कलापिनी बाल भवन मध्ये यावर्षीही दरवर्षीप्रमाणे उत्साहात दीपपूजन झालं. कलापिनी बालभवन स्वास्थ्य योग आणि महिला मंच यांचा एकत्रित दीपपूजनाचा कार्यक्रम प्रसन्न वातावरणात साजरा झाला. आजच्या धावपळीच्या काळात मुलांवर संस्कार करण्याचे कार्य कलापिनी नेहमीच करते. आपले सण त्यांचं महत्त्व मुलांना परिचित होणं हाच कलापिनी बालभवन चा प्रयत्न असतो.

आकर्षक सजावट करून बालभवन स्वास्थ्य योग, महिला मंच यांचं एकत्रित दीपपूजन झालं. यावेळी नटराज पूजन डॉ. सौ. अश्विनी परांजपे आणि सौ.मंजुषा अभ्यंकर तसेच वृषाली आपटे,वैशाली लिमये यांच्या हस्ते करण्यात आलं तर अगदी मशाल,दिवटी,पणती, लामणदिवा, गॅस बत्ती,समयीपासून लाईटच्या माळा अशा दिव्यांची ओळख करून देणार गाणं बालभवन च्या मुलांनी सादर केलं. दिव्यांची आरती झाल्यानंतर महिला मंचच्या दिपाली जोशी यांनी दिव्याचं महत्त्व सांगणारी कविता सादर केली, तर मेधा रानडे यांनी शुभंकरोति कल्याणम हे गीत सादर केलं.

मीरा कोनूर यांनी छानशी गोष्ट सांगितली. दीप पूजनाचे औचित्य साधून माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यात तिसरी आलेल्या चिन्मयी लिमये हीचे कौतुकही यावेळी करण्यात आलं त्याचबरोबर महिला मंचाच्या उषा महाजन यांनीही गाणं सादर केलं तर अरुणा कुलकर्णी यांनी “तेजो निधी लोहगोल” तर महादेवी ढब्बू यांनी कानडीतून दिव्याचं महत्त्व सांगणार गाणं सादर केलं. अतिशय उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. राखी भालेराव हिने केलं तर बालभवनच्या प्रशिक्षकांनी ज्योती ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!