आपला जिल्हाकृषीवार्तासामाजिक

अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण..

हरियाली अमावस्या निमित्त पिंपरी चिंचवड मधील शिवतेज नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात विविध झाडांचे वृक्षारोपण..

Spread the love

अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण, हरियाली अमावस्या निमित्त पिंपरी चिंचवड मधील शिवतेज नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात विविध झाडांचे वृक्षारोपण..Plantation on behalf of Akhil Bharatiya Ma Narmada Parikrama Seva Sangh Plantation of various trees in the area of ​​Vitthal Rukmini Temple at Shivtej Nagar in Pimpri Chinchwad on the occasion of Hariyali Amavasya..

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, २० जुलै.

अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या वतीने आज हरियाली अमावस्या निमित्त पिंपरी चिंचवड मधील शिवतेज नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमास तेथील स्थानिक नगरसेविका सौ योगिता नागरगोजे व सामाजिक कार्यकर्ते इानेश्र्वर नागरगोजे उपस्थित होते.यावेळी नर्मदा मैयाची आरती करून फणस, आंबा, पळस, बेल, बकुळ, औदुंबर, पिंपळ, अर्जुन, सिसम इत्यादी झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले.

कार्यक्रमास अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमेचे पदाधिकारी. संदीप शिंदे, स्नेहा शिंदे, संतोष ताम्हणकर, वर्षा ताम्हणकर ,अरुणा रामेकर, रवींद्र नाना भिसे ,अंजली भिसे स्वाती पिटके , जगन्नाथ जोशी , वैशाली जोशी , रमेश जोगळेकर माधुरी जोगळेकर नारायण गोरे अरुणा गोरे वृषाली चौधरी नीता खरे शलाका मॅडम श्री व सौ अरुण विभांडिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!