आपला जिल्हासामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्हीपीएस माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम संपन्न

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पुण्यस्मरणानिमित विद्या प्रसारिणी सभेच्या सांस्कृतिक समिती कडून कार्यक्रम आयोजित केला होता.

Spread the love

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्हीपीएस माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम संपन्न.On the occasion of the death anniversary of democrat Annabhau Sathe, a program was concluded at VPS Secondary School.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी,२० जुलै.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्हीपीएस माध्यमिक विद्यालयात मान्यवरांचे मनोगतांनी कार्यक्रम संपन्न झाला.ता.१८ रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पुण्यस्मरणानिमित विद्या प्रसारिणी सभेच्या सांस्कृतिक समिती कडून कार्यक्रम आयोजित केला होता.

नियोजनपूर्वक इयत्ता इ. ९ वी च्या सर्व वर्गशिक्षकांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते. प्रशालेचे प्राचार्य. महिंद्रकर सर , उपमुख्याध्यापिका. ढिले मॅडम, पर्यवेक्षक. रसाळ सर, गजेंद्रगडकर सर, पर्यवेक्षिका. देशपांडे मॅडम ,ज्येष्ठ शिक्षिका परदेशी मॅडम यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका. ढिले मॅडम यांनी केले. त्यानंतर इ. ९ वीच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित अभ्यासपूर्ण मनोगते मराठी आणि इंग्रजी भाषेतून सादर केली. पराते मॅडम यांनी अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट विद्यार्थ्यांच्या समोर आपल्या मनोगतातून उलगडला.

मा. प्राचार्यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना वक्तृत्व गुण विकसित करुन सर्वांगिण प्रगती करण्याची गुरुकिल्ली समजावून सांगितली. आपल्या भाषाशैली द्वारे शिवकुमार दहिफळे सर यांनी सुत्रसंचलन केले . मा. प्राचार्यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना वक्तृत्व गुण विकसित करुन सर्वांगिण प्रगती करण्याची गुरुकिल्ली समजावून सांगितली. आपल्या भाषाशैली द्वारे शिक्षक  शिवकुमार दहिफळे सर यांनी सुत्रसंचलन केले . या कार्यक्रमाला सांस्कृतिक समिती प्रमुख आणि शिक्षक प्रतिनिधी. खामकर सर, आणि इ. ९ वीचे सर्व वर्गशिक्षक उपस्थित होते. स्टेजव्यवस्था आणि विद्यार्थी बैठक व्यवस्था  गजानन कदम यांनी उत्कृष्ट केली. तर सुंदर फलकलेखन चित्रकला शिक्षक. चोणगे सर यांनी केले.आभारप्रदर्शन समिती सदस्य. सुर्यवंशी सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!