आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

ईर्शाळवाडी रायगड येथील दरडग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी भोई प्रतिष्ठानचे वैद्यकीय मदत पथक जाणार.

शनिवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी आठ वाजता सेवा मित्र मंडळ चौक शुक्रवार पेठ येथून हे पथक रवाना होणार आहे.. डॉ.मिलिंद भोई

Spread the love

ईर्शाळवाडी रायगड येथील दरडग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी भोई प्रतिष्ठानचे वैद्यकीय मदत पथक जाणार.The medical aid team of Bhoi Pratishthan will go to help the crack-affected brothers in Ershalwadi Raigad.

आवाज न्यूज :  पुणे प्रतिनिधी, २० जुलै.

ईर्शाळवाडी रायगड येथील दरडग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान चे वैद्यकीय मदत पथक रवाना होत असुन यासंबंधी स्थानिक पोलीस प्रशासनाशी सुद्धा संपर्क साधण्यात आला आहे .त्यांच्या समन्वयातून हे मदत कार्य संपन्न होणार आहे.

वैद्यकीय मदती सोबतच या बांधवांना भावनिक व मानसिक आधार देण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प येथून पुढे राबविण्यात येणार असून या दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणार आहे.

शनिवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी आठ वाजता सेवा मित्र मंडळ चौक शुक्रवार पेठ येथून हे पथक रवाना होणार आहे डॉ.मिलिंद भोई यांच्या नेतृत्वात हे पथक रवाना होत असून ज्याना या बांधवांसाठी मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी केले आहे.

संपर्क क्रमांक.9970077773..9822097555

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!