क्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील नाट्यगृहांची भाडेवाढ ५० टक्क्याने झाले कमी; अमित गोरखे यांच्या प्रयत्नांना यश.

Spread the love
  1. पिंपरी चिंचवडमधील नाट्यगृहांची भाडेवाढ ५० टक्क्याने झाले कमी; अमित गोरखे यांच्या प्रयत्नांना यश.Theater rent hike in Pimpri Chinchwad reduced by 50 percent; Success to Amit Gorkhe’s efforts.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, २६ जुलै.

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील नाट्यगृहांच्या बाबतीत भाडेवाढ संबंधी निर्णय घेतला होता. ज्यामध्ये नाट्यगृहाची मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली होती. तसेच ऑनलाइन बुकिंग यासारख्या विषयांवर विचार विनिमय न करता निर्णय घेण्यात आले होते.

या निर्णयांना पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सर्व कलाकार व नाट्यप्रेमी व सर्वसामान्य नागरिकांनी विरोध केला होता. अमित गोरखे यांनी देखील याचा कडाडून विरोध केला होता. पिंपरी चिंचवड शहर ही कामगारनगरी तर आहेच. त्याचबरोबर ती सांस्कृतिक नगरी म्हणून नव्याने उदयास येत आहे. त्यामुळे महापालिकेने घेतलेल्या निर्णयावर नागरिकांमध्ये नाराजी होती आणि ही नाराजी लक्षात घेऊन या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशा प्रकारचे पत्र व्यवहार महापालिका आयुक्त शेखर सिंह, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अमित गोरखे यांनी वारंवार केला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून भाडेवाढीला स्थगिती दिली आहे.

या भाडे वाढीत ५० टक्के दर आज मनपाने कमी केला आहे.त्या संबंधितला ठराव आज महापालिकेच्या बैठकीमध्ये पास करण्यात आला. ऑनलाइन बुकिंगही पुढील दोन महिन्यासाठी स्थगित ठेवण्यात आली आहे त्याचाही विचार लवकरच करण्यात येईल असेही अमित गोरखे यांना आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

नाट्यगृह भाडेवाढ व ऑनलाईन बुकिंग संदर्भात वेळोवेळी अमित गोरखे यांनी पालकमंत्री तथा महापालिका आयुक्त, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला होता. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सांस्कृतिक क्षेत्रातील संघटनाही एकत्रित येऊन याविषयीच्या वेळोवेळी बैठका झाल्या होत्या. आजच्या निर्णयाने ५० टक्केच यश आले आहे असे अमित गोरखे म्हणाले अजूनही भाडेवाढ कमी व्हावी व ऑनलाईन बुकिंग पूर्णतः बंद व्हावे यासाठी आणखी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी आवाज न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!