आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन

वाळंज विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी “प्रकाश प्रवहन” ध्यान सत्राचे आयोजन..

मानसा फाऊंडेशन बॅंगलोर या संस्थेमार्फत 'प्रकाश प्रवहन " ध्यान धारणा शिबिराचे सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे येथे आयोजन केले.

Spread the love

वाळंज विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी “प्रकाश प्रवहन” ध्यान सत्राचे आयोजन..Organized “Prakash Pravahan” meditation session for students in Walanj Vidyalaya..

आवाज न्यूज : आंबवणे प्रतिनिधी, २६ जुलै.

मानसा फाऊंडेशन बॅंगलोर या संस्थेमार्फत ‘प्रकाश प्रवहन ”
ध्यान धारणा शिबिराचे सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे येथे आयोजन केले. यात विद्यालयातील सर्व विद्यार्थी सहभागी झाले. प्रकाश प्रवहन कृतीतून
विद्यार्थ्यांसाठी बुद्धीमत्ता, आकलनशक्ती, ग्रहणक्षमता, स्मरणशक्ती, एकाग्रता वाढण्यासाठी उपयुक्त असलेल्या उपक्रमाची माहिती शिक्षक संजय कुलथे यांनी दिली.

शाळा व शिक्षकांना होणारे लाभ

विद्यार्थी शांत,स्थिर, सकारात्मक बनल्याने,शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी होतो.स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता आकलनशक्ती ग्रहणक्षमता वाढल्याने शाळेचा रिझल्ट उत्तम लागतो.विद्यार्थ्यांमधील उच्च जाणीव विकसित झाल्याने मनाची विशालता,एकोपा निर्माण होतो.परिक्षेला सामोरे जाण्याची अनावश्यक भीती,न्यूनगंडाची भावना,हिंसक प्रवृत्ती कमी होते.कमीत कमी ६ महिने सातत्याने रोज ७ मिनिटे सरावातून आपणास फायदे जाणवतात.

संस्थापक अध्यक्ष नंदकुमार वाळंज यांनी उपक्रमाचे कौतुक केले. व असे कृतीशिबीर घेताना नियमित पणा असावा असे सांगितले.अशी ध्यान कृती करणाऱ्या व्यक्तीस आपल्या विचारांचा भावनांचा क्रियांचा दर्जा सुधारतो. कार्यक्षमता सुधारते.विदयार्थ्यांनी आनंदात सहभाग घेतला. त्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!