अध्यात्मिकमावळसामाजिक

लहान मुले समाजाचे भविष्य – परमपूज्य गुरुदेव पियुष विजय जी महाराज साहेब..

परमपथ अध्यात्मिक चातुर्मास २०२३ - श्री जीरावला पार्श्वनाथ जैन मंदिर,तळेगाव दाभाडे.

Spread the love

लहान मुले समाजाचे भविष्य –
परमपूज्य गुरुदेव पियुष विजय जी महाराज साहेब.Children are the future of society –His Holiness Gurudev Piyush Vijay Ji Maharaj Saheb.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २६ जुलै.

लहान मुले समाजाचे भविष्य असून या मुलांमुळेच उद्याचा नवभारत निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे असे उद्गार आपल्या प्रवचनांमध्ये परमपूज्य गुरुदेव पियुषविजयजी महाराज साहेब यांनी काढले.परमपथ चातुर्मास २०२३ – चलो पाठशाला या पुस्तिकेच्या नियमावलीचे प्रकाशन प्रसंगी गुरुदेव बोलत होते.प्रवचनदक्ष मुनीप्रवर रजतचंद्र विजयजी महाराज साहेब व सेवाभावी मुनी श्री प्रीतीयश विजयजी महाराज साहेब उपस्थित होते.

नियमावलीचे प्रकाशन जैन संघाचे ट्रस्टी अनिल मेहता,भवर सोलंकी, रमेश निबझिया, दिनेश शहा,प्रकाश ओसवाल,किरण ओसवाल,हस्तीमल सोलंकी, इंदर सोलंकी आणि संपूर्ण चातुर्मास चे मुख्य लाभार्थी रवींद्र हस्तिमल सोलंकी यांच्या हस्ते करण्यात आले.चातुर्मास मध्ये देवाची उपासना करून स्वतःचे जीवन सार्थक करा व पापातून मुक्ती मिळवा असे उद्गार गुरु महाराज यांनी काढले.

पाठशाला नियमावलीचे रोज २५ नियम आहेत त्याचे पालन विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन गुरुदेव यांनी केले व जो विद्यार्थी याचे पालन करेल याचा खास सन्मान चातुर्मास समाप्तीला करण्यात येईल.याप्रसंगी जैन भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राजस्थान,मध्यप्रदेश, गुजरात महाराष्ट्राचे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने गुरुभक्त तळेगाव येथे येत असून गुरुदेवांचे आशीर्वाद घेत आहे.तसेच गुरुदेवांच्या आश्रयाखाली सिद्धीतप व धर्मचक्र तप मोठ्या प्रमाणात जैन श्रावक व श्राविका या तपांची आराधना करत आहेत तळेगाव श्री जैन सकल संघ या सर्वांची व्यवस्था पाहत आहे.

तळेगाव दाभाडे येथील जिरावाला जैन मंदिरामध्ये परोपकारी सम्राट आचार्य श्री ऋषभचंद्र सुरिश्वरजी महाराज साहेबांचे यांचे अज्ञानु वरती शिष्य पंचम वर्षीतप तपस्वी मुनीराज श्री पियुषचंद्र विजयजी महाराज साहेब, मुनिराज श्री रजतचंद्र विजयजी महाराज साहेब,मुनी श्री प्रितेशचंद्र विजयजी महाराज साहेब यांचा परमपथ चातुर्मास २०२३ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!