महाराष्ट्रमावळसामाजिक

मावळ तालुक्यातील संवेदनशील गावांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात- आमदार सुनील शेळके.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात २७ जुलै रोजी, राज्य सरकारकडे सुनिल शेळके यांनी केली मागणी.

Spread the love

मावळ तालुक्यातील संवेदनशील गावांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात- आमदार सुनील शेळके.Security measures should be taken in sensitive villages of Maval taluka – MLA Sunil Shelke.

आवाज न्यूज : वडगाव मावळ प्रतिनिधी, २८ जुलै.

मावळ तालुक्यातील धोकादायक गावांत दुर्घटना होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी ( २७ ) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडे केली.

यासंदर्भात आमदार शेळके हे विधिमंडळात बोलताना म्हणाले की तुंग,मालेवाडी, लोहगड, पाले ना.मा.,नायगाव, साई, वाउंड,कल्हाट, सावळा, टाकवे खु., शिलाटणे,सांगिसे, नेसावे इ.गावांमध्ये भुस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो तर यातील बोरज,माऊ,भुशी, कळकराई, मालेवाडी, तुंग,लोहगड आणि ताजे ही ८ गावे अतिसंवेदनशील असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येत आहे.

 

अशा धोकादायक ठिकाणी एखादी दुर्घटना झाल्यानंतर सरकारकडून कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात येते त्या ठिकाणी वाडी,वस्तीचे, गावाचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येतो. मात्र गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात.या गावांचा गांभीर्याने विचार होऊन राज्य सरकारने आवश्यक पावले उचलावीत,अशा धोकादायक गावांचा गांभीर्याने विचार होऊन राज्य सरकारने आवश्यक पावले उचलावीत,अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!