पर्यटनमावळसामाजिक

लोणावळा जवळील टाटा तलावाचे पाण्याचा इंद्रायणी नदीत विसर्ग सोडल्यास हुडको काॕलनी , इंद्रायणीनगर.. ला पुराचा धोका ; पावसाचे तांडव सुरूच.

टाटातलावातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेल्याने, प्रशासकीय अधिकारी यांचेसह शासकीय अधिकारी, खडबडून जागे झाले आणि त्यांनी टाटा तलावाकडे पाहणी करण्यासाठी धाव घेतली.

Spread the love

लोणावळा जवळील टाटा तलावाचे पाण्याचा इंद्रायणी नदीत विसर्ग सोडल्यास हुडको काॕलनी , इंद्रायणीनगर ला पुराचा धोका ; पावसाचे तांडव सुरूच.If water of Tata Lake near Lonavala is released into Indrayani River, Hudko Kalani, Indrayaninagar is at risk of flooding; The rain continues.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी २८ जुलै.

लोणावळा जवळील टाटा तलावाचे पाण्याचे इंद्रायणीनदीत विसर्ग सोडल्यास हुडको काॕलनी, इंद्रायणीनगर ला पुराचा धोका असून लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी यांनी तलावाची पाणी पातळी वाढल्यामुळे सहारापुलावर जावून पाहणी केली. कालअखेर २८६५ मी.मीटर पाऊस झाला. गतवर्षी ची सरासरी ओलांडून पाऊस शतक पूर्ण करून ११२ इंच बरसला आहे. टाटातलावातील पाणीसाठा वाढल्यामुळे,गेली चार पाच दिवस सतत कोसळणारा पाऊस या मुळे टाटा तलावाचे विस्तीर्ण पाञात पाणीपातळी वाढली आहे.

आजही सकाळपासून पावसाचे तांडव सुरूच असून पर्यटकांची गर्दी शनिवारी , रविवारपेक्षा कमी असूनही टाटा तलावाचे समोरच्या दोन धबधब्यात भिजण्याचा मिञमंडळी व कुटूंबाचे सदस्यांचे बरोबर आनंद घेताना दिसले.
टाटा तलाव काठोकाठ भरायला काही आवकाश असून ता.२६ व २७ जुलै २००९ मधे जसा काठोकाठ भरून छत्तीस मो-यामधून पाणी नदीपाञात सोडल्याने पूर आला होता. तशी परिस्थिती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नदीपाञ खोलीकरण करण्यात आले असून व भांगरवाडी येथे नदीला भिंत बांधली गेल्याने याचा परिणाम म्हणून त्यामुळे नदीजवळच असलेल्या कैलासनगर झोपडपट्टीत , पांगारे चाळ , हुडको काॕलनी , इंद्रायणीनगर झोपडपट्टीत तसेच वलवण भागात पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त केली जाणार आहे.

लोणावळ्यात  ता.२६ रोजी चोवीस तासात १०५ मी.मी.(४.१३ इंच ) पाऊस झाला.
कालअखेर २८६५ मी मीटर (११२ इंच ) पाऊस झाला.
गतवर्षी कालअखेर २९३८ मी.मीटर ((११५ इंच ) पाऊस पडला. गतवर्षी ची पावसाची सरासरी आज दिवसभर पडलेल्या पावसाने ओलांडून टाटा तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. टाटा पाॕवर कंपनीकडून खोपोली येथील पाण्याचा डक्टलाईनमधून विसर्ग वाढविला असूनही संततधार पावसामुळे धरणामधे पाण्याची पातळी तासातासांनी वाढताना दिसत आहे.
लोणावळ्यात पावसाचे तांडव सुरूच असून आज सायंकाळी चारनंतर टाटातलावातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेल्याने प्रशासकीय अधिकारी यांचेसह शासकीय अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी टाटा तलावाकडे गाडीतून जावून पाहणी केली.

टाटा लेक समोर धबधब्यात भिजण्याचा आनंद घेताना अनेक पर्यटकांची येथे गर्दी दिसली.येथे एका वडापाव, भजी, मॕगी, चहा पाॕईंटला भेट दिली असता. येथील श्री कानिफनाथ स्नॕक सेंटर चे श्री.कदम, श्री.समर्थकृपा स्नॕकचे.पांगारे, तसेच श्री.स्वामी समर्थ स्नॕक सेंटरचे मनिषा खराडे , रंजना भिकोले , आचारी प्रमोद खोपडे आणि  मालपोटे यांनी सांगितले, की येथे धबधब्यात भिजून पर्यटक मका भजी , कांदा भजी , महाग असल्याने मॕगी , वडापाव , गरमागरम चहा , काॕफी यांचा मनसोक्त आनंद घेतात.

आज थोडी गर्दी कमी आसली , तरी व्यवसायावर परिणाम होत नाही.कारण पाऊस सतत सुरू आहे.
शनिवारी , रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने उद्यापासून गर्दी वाढणार आहे.
येथील शर्मा यांची मयाचे भुट्याची हातगाडी धबधब्याचे समोर असून भिजून आलेले व फिरायला येणारे पर्यटक आवर्जून गरमागरम मसालेदार भुट्टा खाण्याचा आनंद घेतात,
असे आवाज न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टाटालेक समोर पोलिसांकडून पाच पोलिसआधिकारी व कर्मचा-यांचे कडून माईकमधे सूचना देत, कधी दंडात्मक कारवाई करत सहारा पुलावरील वाहतूक सुरळीत केली जात असून, भुशीडॕम वरही पाच पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचे मार्फत पायऱ्यावर व पार्कींगमधे वाहने लावणे , वहातूक सुरळीत करणेकामी चोख बंदोबस्त लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांचे नेतृत्वाखाली व लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सहाय्यक अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!