आपला जिल्हाक्राईम न्युजपिंपरी चिंचवड

सराईत गुन्हेगार अमर चौहाण टोळीवर पोलीसांकडुन मोका कारवाई..

सहा महिन्यात २१ गुन्हेगारी टोळ्यांच्या २०९ अट्टल गुन्हेगारांना शिकविला धडा…

Spread the love

सराईत गुन्हेगार अमर चौहाण टोळीवर पोलीसांकडुन मोका कारवाई; सहा महिन्यात २१ गुन्हेगारी टोळ्यांच्या २०९ अट्टल गुन्हेगारांना शिकविला धडा…Police crackdown on Sarait criminal Amar Chauhan gang; Lesson taught to 209 persistent criminals of 21 criminal gangs in six months…

आवाज न्यूज : पिंपरी प्रतिनिधी, २८ जुलै.

सराईत गुन्हेगार अमर चौहाण टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई केली.त्यानुसार आरोपींना अटक करून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली. सराईत गुन्हेगार अमर चौहाण टोळीवर सराईतांच्या गुन्हेगारीचा पॅटर्न मोडून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारी ते जुलै २०१३ या कालावधीत २१ गुन्हेगारी टोळ्यांच्या २०९ अट्टल गुन्हेगारांवर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली. शहर पोलिसांच्या या ‘मोका’ पॅटर्नमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

टोळी प्रमुख अमर ऊर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहाण (वय 33, रा. पिंपरी), रोहित प्रवीण धनवे (वय २०, रा. पिंपरी), अक्षय आण्णा रणदिवे (वय २९, रा. भोसरी), साहिल सुधीर धनवे (वय २०, रा. पिंपरी), सोन्या रणदिवे (रा. पिंपरी) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमर चौहाण याने संघटित टोळी तयार केली. अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळण्याच्या उद्देशाने टोळीचे वर्चस्व आहेत. आणि दहशत निर्माण करण्यासाठी वेगवेगळे गुन्हे केले आहेत. या टोळीवर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पिंपरी, निगडी भोसरी एमआयडीसी भोसरी, चिंचवड तर पुणे आयुक्तालयातील बंडगार्डन येरवडा, विश्रांतवाडी, समर्थनगर सहकारनगर, विमानतळ, चंदननगर पोलिस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, कट करणे, पुरावा नष्ट करणे,अपहरण करणे, दरोड्याची तयारी करणे, जबरी चोरी, खंडणी, दुखापत, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीरपणे घातक शस्त्र बाळगणे असे गुन्हे नोंद आहेत.

अमर चौहाण याने स्वतंत्रपणे १२ गुन्हे केले आहेत. तर त्याच्या टोळीवर एकूण ३८ गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पिंपरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांनी उपायुक्त विवेक पाटील यांच्यामार्फत पोलिस आयुक्त कार्यालयाकडे सादर केला. त्यानुसार अपर आयुक्त वसंत परदेशी यांनी मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त विवेक परदेशी, उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, उपायुक्त (परिमंडळ १) विवेक पाटील, सहायक आयुक्त (गुन्हे १) बाळासाहेब कोपनर, सहायक आयुक्त (पिंपरी) सतीश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, राम राजमाने, सहायक फौजदार अनिल गायकवाड, पोलिस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, ओंकार बंड, दत्ताजी कौठेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!