आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी सखाराम गायकवाड यांची बिनविरोध निवड..

Spread the love

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी सखाराम गायकवाड यांची बिनविरोध निवड.Unopposed election of Sakharam Gaikwad as Director of Shree Sant Tukaram Cooperative Sugar Factory.

आवाज न्यूज : मुळशी प्रतिनिधी, ६ ऑगष्ट.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सखाराम मारुती गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

निवडणूक अधिकारी एस.बी.घुले निवडणूक निर्णय अधिकारी सहकारी संस्था मुळशी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली.कारखान्याच्या सन २०२०-२१ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये कामशेत गटातुन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार बाळासाहेब गायकवाड यांची निवड झाली होती. पंरतु सन २०२२ साली बाळासाहेब गायकवाड यांचे दुखद निधन झाले.यामुळे हि जागा रिक्त असल्याने कारखान्याच्या दि.२७/०७/२०२३ रोजी झालेल्या बैठकीत सखाराम गायकवाड यांची सर्व संचालक मंडळाच्या वतीने बिनविरोध संचालक पदी निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी गायकवाड यांनी बोलताना सांगितले की गेली अनेक वर्ष समाजकारणाचा व राजकारणाचा वसा मला लाभला असुन.मी मावळ तालुक्यातील शिवणे गावातील शेतकरी कुटुंबातील असून मला शेती विषयी परिपूर्ण माहिती असून शेतकरी,मंजुर,कामगार, आणि सर्व नागरीकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल. या मागे मी आजवर केलेल्या छोट्या – मोठ्या सामाजिक, शैक्षणिक,राजकिय कार्याची दखल,वाडवडीलांचे संस्कार यांचा मोलाचा वाटा आहे.माझ्या वर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले व उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे.त्या हेतुने मी शेतकऱ्यांसाठी काम करत राहिल असे गायकवाड यांनी बोलताना सांगितले.यावेळी संचालकांच्या उपस्थित मान्यवरांकडून शुभेच्छा देऊन,पेढे भरवून, गुलालची उधळण करुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!