आपला जिल्हाक्राईम न्युजसामाजिक

इंदापूर विहीर दुर्घटनेत चौघांचे मृतदेह सापडले..

विहीर मालकासह ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल...

Spread the love

इंदापूर विहीर दुर्घटनेत चौघांचे मृतदेह सापडले;विहीर मालकासह ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल..Four dead bodies found in Indapur well accident; case of culpable homicide filed against well owner along with contractor.

आवाज न्यूज : वार्ताहर, ६ ऑगष्ट.

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे भल्या मोठ्या विहिरीची रिंग करताना तालुक्यातील बेरवाडी येथील ४ मजुर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे प्रचंड मोठी दुर्घटना घडली. या मजुरांना वाचविण्यासाठी तब्बल अनेक वाहने कामाला लावण्यात आली. सरकारी यंत्रणा, खासगी लोकांकडून करण्यात आलेली मदत अशी प्रचंड यंत्रणा मदतकार्यास सक्रिय झाली.तब्बल ७० तास हे शोधकार्य सुरू होते. मात्र दुर्दैवाने इतके प्रचंड प्रयत्न करूनही एकाही व्यक्तीला वाचविता आले नाही.

दरम्यान इंदापूर विहीर दुर्घटना प्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली. विहीर मालकासह ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार या दुर्घटनेत सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी (वय ३०), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३० ) आणि मनोज ऊर्फ लक्ष्मण मारुती सावंत (वय ४० ) यांचा मृत्यू झाला आहे.

विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत देण्याची घाेषणा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!