महाराष्ट्रमावळसामाजिक

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय यामध्ये आज ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा..

रजनीगंधाताई संतोष खांडगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

Spread the love

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय यामध्ये आज ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा, रजनीगंधाताई संतोष खांडगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.New Samarth Vidyalaya run by Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal today celebrated the 76th Independence Day with great enthusiasm, the flag hoisting program was concluded with the auspicious hand of Rajinikanth and Santosh Khandge.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १५ ऑगष्ट.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय यामध्ये आज ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शालेय समिती अध्यक्षा. रजनीगंधाताई संतोष खांडगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी नवीन समर्थ विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष महेशभाई शहा, डॉ शालिग्राम भंडारी , दीपक बाळसराफ ,भगवान शिंदे,  सुदाम वाळुंज, माजी मुख्याध्यापिका इरावती केतकर , सीमा गावडे ,नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य  शंकर नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत यांचे सामुदायिक गायन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक  रेवाप्पा शितोळे यांनी केले मान्यवरांचे आभार विद्यालयाच्या प्राचार्या  वासंती काळोखे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रभा काळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

१९८७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नविन समर्थ विद्यालयात घेतला ७६ व्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद.

१९८७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नविन समर्थ विद्यालयात घेतला ७६ व्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद. त्यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत, नारखेडे सर, केतकर मॅडम, गावडे मॅडम, १९८७ ची दहावीच्या बॅचच्या मावळ परिसरातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हजेरी लावली १० वी अ च्या वर्गात बसण्याची संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, नारखेडे सर, केतकर मॅडम, गावडे मॅडम यांना गुलाबाची फुले देत त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक  रेवाप्पा शितोळे यांनी केले मान्यवरांचे आभार विद्यालयाच्या प्राचार्या  वासंती काळोखे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रभा काळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!