महाराष्ट्रमावळसामाजिक

सरस्वती विद्यामंदिर मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..

संस्थेचे अध्यक्ष. सुरेश झेंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Spread the love

सरस्वती विद्यामंदिर मध्ये  स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..Independence Day celebrated with enthusiasm in Saraswati Vidyamandir..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, १५ ऑगष्ट.

सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष. सुरेश झेंड ,सदस्य  प्रमोद चोळकर , विश्वास देशपांडे ,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका. रेखा परदेशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक. नवनाथ गाढवे, बालवाडीच्या विभाग प्रमुख. सोनाली काशीद व माजी विद्यार्थी  रोहित सोनटक्के यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष. सुरेश झेंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी नन्ना मुन्ना राही हु व इयत्ता सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी बलसागर भारत होवो हे देशभक्तीपर गीत सादर केले. तंबाखूमुक़्त समाजाची ची शपथ सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, संस्था सदस्य, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांना देण्यात आली.

माजी विद्यार्थी रोहित सोनटक्के हा नुकताच पोलीस उपनिरीक्षक झाल्याबद्दल संस्थेतर्फे त्याचा गौरव करण्यात आला.  सुरेश झेंड व  रोहित सोनटक्के यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संजय गायकवाड यांनी केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!