आपला जिल्हासामाजिक

भक्ती शक्ती येथे निगडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

ध्वजारोहण झाल्यानंतर "EPS -95" राष्ट्रीय संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या सूचनेनुसार संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

Spread the love

भक्ती शक्ती येथे निगडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.Flag Hoisting by Senior Police Inspector Ranganath Unde of Nigdi Police Station at Bhakti Shakti.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, १६ ऑगष्ट.

भारताच्या स्वातंत्र्यदिना निमित्त १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता निगडी भक्ती शक्ती येथे कै.शंकर लक्ष्मण काळभोर चौकात निगडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी निगडी प्राधिकरण मधील मनोज ढाका  यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस डिफेन्स अकॅडमी मधील मुला मुलींनी मानवंदना दिली. ध्वजारोहण झाल्यानंतर “EPS -95” राष्ट्रीय संघर्ष समिती ( पेन्शन धारक) चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत साहेब यांच्या सूचनेनुसार संघटनेच्या वतीने भक्ती शक्ती शेजारील श्री खंडोबा मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत,निगडी पोलिस स्टेशनचे PSI राजेंद्र बोरसे साहेब, हवालदार शिंदे साहेब तसेच देहूरोड कॅ.बोर्ड वॉर्ड क्रं.5 मधील ( सिद्धीविनायक नगरी,श्री विहार,श्री नगरी,आशिर्वाद काॅलनी आणि दत्तनगर ) या परिसरातील ह.भ.प.गरुड नाना, ह.भ.प.सुधीर ढगे, ह.भ.प.रसाळ काका, ह.भ.प.गणपत शिरसाठ,ह.भ.प.बन्सी रोडे काका,ह.भ.प. खानझोडे काका, ह.भ.प.अर्जुन महाराज फलके ,ह.भ.प. सोपान महाराज पठारे, ह.भ.प. भन्साळी काका, भाऊसाहेब काळभोर,ॲड राजेंद्र काळभोर, अरविंद पाटील साहेब,संजय बनसोडे साहेब,वर्मा साहेब,किसनराव करदोरे, मोरे काका , चन्नाप्पा हुक्केरी, बाळासाहेब आवंढे, प्रसाद घुले, तसेच EPS -95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे पिंपरी – चिंचवड शहर अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, तसेच संघटनेचे पदाधिकारी विजय राजपाठक,सुरेश साळुंके,किसन तरस, अशोक भुजाडे,विलास ढमाले,बळीराम कातंगळे,प्रकाश मुद्दलगिरी,रतनसिंग पाटील,सूर्यकांत खोल्लम,बी.बलराम, लक्ष्मण देवरे,सतीश झेंडे,महिला आघाडी .मंगल तानाजी काळभोर,शोभा संभाजी काळभोर, काजल योगेश काळभोर, शैलाताई चिंचोलीकर , आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन योगेश काळभोर,अमोल काळभोर,सतिश झेंडे, आकाश काळभोर, तेजस काळभोर,हणुमंत रेवी इत्यादींने केले.

यावेळी ह.भ.प.गरुड नाना यांनी आपला देश कशा प्रकारे स्वातंत्र्य झाला या विषय माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी काळभोर यांनी केले. व आभार सुधीर ढगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!