पिंपरी चिंचवडसामाजिक

प्राध्यापकांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःमध्ये बदल घडवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा.. सुरेश धर्मावत.

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्तकलागुणांचा विकास करून भावीकाळात सुजाण नागरिक घडविण्यासठी विविध ध्येयपूर्तीसाठी सामोरे जात स्वतःची क्षमता वाढवावी. डॉ. दीपक शहा, संस्थापक प्रतिभा महाविद्यालय.

Spread the love

प्राध्यापकांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःमध्ये बदल घडवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा.. सुरेश धर्मावत.Professors should change themselves according to the changing technology and develop the students holistically.. Suresh Dharmawat.

आवाज न्यूज गुलामअली भालदार चिंचवड प्रतिनिधी,१६ ऑगष्ट.‌‌

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहन रेल्वे बोर्डाचे माजी विभागीय सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश धर्मावत यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, मुख्यप्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे, मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस, एम.बी.ए.चे संचालक डॉ. बोरगांवे, माजी लेफ्टनंट सुधाकर पाटील, पालक, विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते. श्री धर्मावत यांच्या हस्ते कमला शिक्षण संस्थेतील प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, क्रीडा क्षेत्रातील विशेष नैपुण्य मिळविलेल्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई च्या) स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध वाद्यपथका समवेत पथसंचलन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

धर्मावत पुढे म्हणाले, ‘प्रतिभा महाविद्यालयाने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयाप्रमाणे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.’ प्राध्यापकांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये भर टाकून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवित संस्थेची प्रतिष्ठा देखील वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत, ही कौतुकास्पद व हेवा वाटणारी बाब आहे. आपला भारत देश जगाबरोबर प्रगती क्षेत्रात पुढारलेला असून महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. येणार्‍या काळात देश विश्वगुरू होईल, असा विश्वास वाटतो.

संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, स्वातंत्र्यदिन आज आपण संस्कृतीचे जतन करून साजरा करीत आहोत. आव्हानांना सामोरे जाऊन त्यावर मात करून प्राध्यापकांनी स्वतःची ओळख निर्माण करीत स्वतः संपन्नता, कुटूंब, समाज व पर्यायाने देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन करून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्तकलागुणांचा विकास करून भावीकाळात सुजाण नागरिक घडविण्यासठी विविध ध्येयपूर्तीसाठी सामोरे जात स्वतःची क्षमता वाढवावी, अशा सूचना यावेळी केल्या.

ध्वजारोहनानंतर प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई च्या) विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर देशभक्तीपर गीते, नृत्य, लाठी-काठी, मल्लखंब, कराटे सादर केले. विद्यालयातील डी.वाय.एस.एफ. चे संचालक रमेश वर्‍हाडे, मुस्कान पटेल, अमर नेटके, प्रसाद गुरव, अंजली बर्वे, आरती तपाले, सार्थक खरचन, नृत्य प्रशिक्षक दिनेश पटेल, याज्ञी पटेल, भारती सोनार, सागर पवार, संगीत साथ देणारे अथर्व शिंदे, एडमंड मेंडिस, अभिषेक थोरात, मारीअप्पन मुदलीयार, योग शिक्षीका सुनेत्रा बेदकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस, उपमुख्याध्यापिका लिजा सोजू यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. मनिषा पाटील यांनी केले तर, आभार प्रा. पल्लवी चव्हाण यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!