महाराष्ट्रमावळ

तळेगाव रेल्वेस्टेशनला चाळीस कोटी रुपये, आत्यानुधिक करण्यासाठी खर्च करण्यापेक्षा, बेगडेवाडी रेल्वेस्टेशन सुशोभिकरण व चार उड्डाणापूलासाठी खर्च करण्याची गरज.

Spread the love

तळेगाव रेल्वेस्टेशनला चाळीस कोटी रुपये, आत्यानुधिक करण्यासाठी खर्च करण्यापेक्षा, बेगडेवाडी रेल्वेस्टेशन सुशोभिकरण व चार उड्डाणापूलासाठी खर्च करण्याची गरज.Forty crore rupees for Talegaon railway station, need to be spent on beautification of Begdewadi railway station and four flyovers instead of spending on renovation.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १९ ऑगष्ट.

तळेगाव रेल्वेस्टेशनला चाळीस कोटी आत्यानुधिक करण्यासाठी खर्च करण्यापेक्षा बेगडेवाडी रेल्वेस्टेशन सुशोभिकरण व चार उड्डाणापूलासाठी खर्च करण्याची गरज आहे.

घोरावडेश्वर डोंगराला ऐतिहासिक महत्व असून बेगडेवाडी ऐवजी भेगडेवाडी असे नामकरण गरजेचे व या रेल्वेस्टेशनचा सुशोभिकरण व कायापालट करणे गरजेचे असून एकाच रेल्वे र्स्टेशनला चाळीस कोटी खर्चापेक्षा चार ते पाच ठिकाणचे उड्डाणपूल बनवायला पाहिजे. लोकांची सोयही होईल , आणि रेल्वेचे गेट नसल्यामुळे मनुष्यबळ व सतत लांबच्या गाड्यांना होणारा उशीरही वाचेल.लोणावळा रेल्वे वरील उड्डाणापूल , कामशेत रेल्वे उड्डाणपूल , वाडिवळे येथील उड्डाणपूल , मळवली व कान्हे येथील उड्डाणपूल होणे अत्यावश्यक असून यामुळे लोकांचा वेळही वाचेल व सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना रेल्वेगेटमुळे होणारा अडथळाही कमी होईल.

रेल्वेगेटवर अनेक मिनिटे ते तासनतास लोणावळा भांगरवाडी येथे वाहतूक असते.त्यामुळे रेल्वेच्या लोकल गाड्यांना व सुपरफास्ट गाड्यांना कधीकधी उशीर होतो.तो उशीर होऊ नये, तसेच मावळातील दळणवळण सुरळीत चालावी, यासाठी रेलमंञी यांनी उड्डाणापूल बांधून नागरिकांची सोय करावी.

 

बेगडेवाडीचे सुशोभिकरणाची गरज असून येथून घोरावडेश्वरसाठी लोक उतरतात..कुंडमळा येथेही पर्यटक जा ये करतात. भेगडेवाडी चा bhegdewadi मधील एच हे अक्षर स्वातंञ्यपूर्व काळापासून काढून टाकल्यामुळे बेगडेवाडी झाले आहे .त्याबाबत सरकारने तांञिक दुरूस्ती करावी , व या रेल्वेस्टेशनचा कायापालट करावा , अशी मागणी काही रेल्वे प्रवाशी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!