आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

सरस्वती विद्यामंदिर मध्ये नागपंचमीनिमित्त सर्पमित्रांच्या व्याख्यानाचे आयोजन..

Spread the love

सरस्वती विद्यामंदिर मध्ये नागपंचमीनिमित्त सर्पमित्रांच्या व्याख्यानाचे आयोजन..Saraswati Vidyamandir organized a lecture by Sarpamitra on the occasion of Nag Panchami.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, १९ ऑगष्ट.

शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी नागपंचमीनिमित्त सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक विभागात सर्पमित्र भास्कर माळी यांच्या व्याख्यानांचे आयोजन इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीता कुलकर्णी यांनी केले. प्रोजेक्टरवर इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना सापांचे प्रकार, विषारी व बिनविषारी सापांची माहिती दाखविण्यात आली . सर्पदंशझालेल्या व्यक्तीची काळजी कशी घ्यावी, साप दाताचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी करतो .विषारी सापाला दोन सुळे असतात .त्याचप्रमाणे सर्पदंश झालेल्या व्यक्तींना प्रथमोपचार कसे करावे याची माहिती देण्यात आली.

सर्पमित्र निलेश गराडे आणि किरण मोकाशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दाखविलेल्या प्रोजेक्टवरील सापांच्या माहिती विषयी प्रश्न विचारण्यात आले. उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. उपस्थित सर्पमित्रांचा शाळेच्या वतीने पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. साप हा शेतकऱ्याचा मित्र असून सापाला मारू नये. साप दिसला तर सर्पमित्रांना फोन करावा अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

कार्यक्रमाचे आभार  सुरेखा रासकर यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे नियोजन सरस्वती विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेना प्रमुख  संजय गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!