क्राईम न्युजपर्यटनमहाराष्ट्र

पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या आरोपीच्या तिन तासात आवळल्या मुसक्या,

लोणावळा ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगीरी.

Spread the love

पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या आरोपीच्या तिन तासात आवळल्या मुसक्या, लोणावळा ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगीरी.In three hours, the accused who broke the windows of tourists’ four-wheeler vehicles and stole them, the brave performance of the Lonavla rural police.

आवाज न्यूज : श्रावणी कामत‌ लोणावळा प्रतिनिधी, २० ऑगष्ट..

लोणावळा परीसरात जुने पुणे मुंबई हायवे रोडवरील तसेच मळवली, काल भाजे परीसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात, शनिवार दिनांक 19/08/2023 रोजी मौजे भाजे व मनशक्ती केंद्र वरसोली परीसरामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून गाडीतील मौल्यवान बॅगांमधील रोख रक्कम, मोबाईल इतर मौल्यवान वस्तु इत्यादी कोणीतरी अज्ञात चोरटा चोरून नेत असल्याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला दोन तक्रारदार तक्रार देण्यास आले असता त्यांच्याकडून उपयुक्त माहिती घेवून त्यानुसार मा. सहा. पोलीस अधीक्षक. सत्यसाई कार्तीक सौ व मा. पोलीस निरीक्षक. किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार नितेश कवडे व पोलीस नाईक गणेश होळकर यांचे पथक रवाना झाले.

सदर पथकाने घटनेच्या अनुषंगाने आरोपीचा व गाडीचा शोध घेण्यासाठी प्रथम मनशक्ती केंद्र वरसोली येथे घडलेल्या घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली असता सदर फुटेजमध्ये इनोव्हा सदृष्य कारमधील 30 ते 35 वयाचा अंगात चॉकलेटी रंगाचा टी शर्ट घातलेला इसम हा चारचाकी गाडीची काच फोडून चोरी करताना आढळल्याने पोलीसांनी सदर संशयीत इनोव्हा कारचा वरसोली, कार्ला, मळवली, भाजे व लोहगड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.

त्यावेळी काळ्या काचा असणारी टोयोटा कंपनीची इनोव्हा कार नं. GJ 06 FC 3806 ही मौजे भाजे धबधबा नं. 2 परीसरात संशयीत रित्या फिरत असताना मिळुन आल्याने पोलीसांनी कारचालकाकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अखिल सलीम व्होरा वय 32 बर्ष रा. नुतन नगर अमिना मंजील जवळ, आनंद, गुजरात 388001 असे सांगीतले. पोलीसांनी सदर कारची झडती घेतली असता नमुद कार चालकाकडे इनोवा गाडीमध्ये सीमकार्ड नसलेले एकुण 6 मोबाईल, तसेच 5 पर्स, 2 बॅगा, 2 पॉवर बँक, 2 घड्याळे, 22,900/- रोख रक्कम व इनोव्हा कार असा एकुण 12,11,100/- रुपये असा माल मिळुन आला.

त्याबाबत पोलीसांनी अधीक चौकशी केली असता सदर माल व रोख रक्कम ही काही गाड्यांच्या काचा फोडून चोरी केली असल्याचे त्याने कबूली दिल्याने त्यास पुढील चौकशी कामी पोलीस स्टेशन येथे आणले. सदर चोरीच्या घटनेबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 350/2023 भादवि 379,427 व गु.र.नं. 351/2023 भादवि 379,427 असे गुन्हे दाखल झाले असुन सदर आरोपीकडून जप्त केलेल्या वस्तुंमध्ये सदर दोन्ही गुन्ह्यातील तक्रारदार यांच्या वस्तु मिळुन आलेल्या आहेत.

सदर आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली असुन त्यास मा. न्यायालयाने दिनांक 22/08/2023 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदर आरोपी जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनला त्यांचेकडील गुन्ह्यात पाहीजे असल्यास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

 

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व्यतीरीक्त यापूर्वी लोणावळा शहर, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत देखील अशा प्रकारचे गुन्हे घडलेले असुन अशा गुन्ह्यांचा कसोशीने तपास करुन गुन्हे उघडकीस आणन्याबाबत मा. सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यासाई कार्तीक सो यांनी सर्व पोलीस पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सदरचे दोन गुन्हे घडताच लोणावळा ग्रामीण पोलीसांनी तत्परता दाखवून यातील गुन्हेगारास शिताफीने अटक करुन दोन्ही गुन्हे तात्काळ उघडकीस आणले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक. अंकीत गोयल सो, मा. अपर पोलीस अधीक्षक. मितेश गट्टे सो. सहा, पोलीस अधिक्षक. सत्यसाई कार्तीक सो व वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन. किशोर धुमाळ सो यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक. निलेश माने सो, पोलीस उपनिरीक्षक. भारत भोसले, सहा. फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार नितेश कवडे, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस हवालदार बाळकृष्ण भोईर, पोलीस हवालदार विजयभाऊ मुढ यांचे पथकाने केलेली असुन गुन्ह्यांचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!