मावळसामाजिक

पुणे मुंबई द्रूतगतीमार्गावर खोपोली हद्दीत कंटेनर अपघातात कारचालक व महिला प्रवासी जागीच ठार..

मुंबई हून पुण्याकडे जाणाऱ्या आणखी चार कार त्यावेळी एकमेकांना आदळल्या...

Spread the love

पुणे मुंबई द्रूतगतीमार्गावर खोपोली हद्दीत कंटेनर अपघातात कारचालक व महिला प्रवासी जागीच ठार..A car driver and a female passenger died on the spot in a container accident on Pune Mumbai Expressway in Khopoli area.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी,२१ ऑगष्ट.

पुणे मुंबई द्रूतगतीमार्गावर खोपोली हद्दीत कंटेनर अपघातात कारचालक व महिला प्रवासी जागीच ठार झाले.या भीषण अपघातात दोन महिलांसह सुमारे पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याने दोघांना कामोठी येथील खाजगी रूग्णालयात, तर आणखी दोघांना एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

मुंबई पुणे किलोमीटर क्रमांक ३५.९२ जवळ हा भीषण अपघात सकाळी नऊचे सुमारास झाला. मुंबई पुणे द्रूतगतीमार्गावर पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा कंटेनर क्रमांक एम एच ४६,एआर 0181 हा पुण्याहून मुंबई बाजूकडे जात असता, त्याचा पुढील टायर फुटून, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो मधोमध दुभाजकावर धडकून पुणे बाजूकडे जाणाऱ्या वाहनांचे लेनवर पलटी होऊन एका कारवर जोरात धडकला , त्यामुळे या धडकेने स्विफ्ट डिझायर एमएच 48 ए6512 या कारमधील चालक व महिला प्रवासी जागीच ठार झाले.

तसेच मागून मुंबई हून पुण्याकडे जाणाऱ्या आणखी चार कार त्यावेळी एकमेकांना आदळल्या. आणि सुमारे पाच कारचे नुकसान झाले. दोन जखमी झालेल्या महिलांना एमजीएम रूग्णालयात कामोठे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातग्रस्त कंटेनरला बाजुला काढण्यासाठी काही वेळ वाहतूक बंद करण्यात आली होती.यावेळी आयआरबी कंपनीचे कर्मचारी ,देवदूत यंञणा , बोरघाटातील वहातूक पोलिस , खोपोली पोलिस व वाहतूक पोलिसांकडून आणि स्थानिक रहिवाशी यांनी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढले व रूग्णालयात दाखल केले.

अपघातग्रस्त कंटेनर क्रेनने बाजूला घेवून व  अपघातग्रस्त कार बाजूला घेण्यात येवून वाहतूक काही वेळाने पुणे बाजूचे लेनवर सुरळीत करण्यात यश आले. पुढील तपास खोपोली पोलिस करीत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!