मावळसामाजिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..

संस्थेचे विश्वस्त सुरेश साखवळकर यांच्या अध्यक्षतेखाली वानप्रस्थाश्रम च्या सभागृहात सभा पार पडली.

Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..All India Marathi Natya Parishad Branch Talegaon Dabhade Annual General Meeting concluded..

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ ऑगष्ट.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगाव दाभाडे शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. रविवार दिनांक २० ऑगस्ट रोजी संस्थेचे विश्वस्त सुरेश साखवळकर यांच्या अध्यक्षतेखाली वानप्रस्थाश्रम च्या सभागृहात सभा पार पडली.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई नियामक मंडळ सदस्य तथा तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलन समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल एकमताने अभिनंदनाचा ठराव संमत करून त्यांचा सत्कार करण्यात आला नंतर प्रास्ताविक करताना सुरेश धोत्रे यांनी १०० वे नाट्य संमेलन तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदे मार्फत प्रस्तावित नाट्यगृह याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सचिव प्रसाद मुंगी यांनी सन २०२२-२०२३ च्या वार्षिक अहवालाचे वाचन केले तर खजिनदार नितीन शहा यांनी गतवर्षीच्या ताळेबंद सादर करून सन २०२३-२०२४ करिताचे अंदाज पत्रक मांडले.सभेचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाखेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आलेख मांडला. तसेच नाट्यगृह उभारण्यासाठी तळेगाव शाखेकडून होणारे प्रयत्न आणि त्यासाठी पावसाळी अधिवेशनात विषय मांडत आमदार सुनिल शेळके यांच्याकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद याबद्दल अभिनंदन केले. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित सभासदांचे आभार राजेश बारणे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!