मावळसामाजिक

स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार 2023”..

स्वास्थ्य आणि आरोग्य- कल्याण क्षेत्रातील असाधारण जीवन-कार्यास समर्पित..

Spread the love

स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार 2023” ,स्वास्थ्य आणि आरोग्य- कल्याण क्षेत्रातील असाधारण जीवन-कार्यास समर्पित Swami Kuvalayananda Yoga Award 2023”, dedicated to extraordinary life-work in the field of health and wellness.

आवाज न्यूज  : श्रावणी कामत लोणावळा प्रतिनिधी, ३० ऑगष्ट.

लोणावळ्यातील जागतिक कीर्ती असलेल्या कैवल्यधाम योग संस्थेतर्फे यंदाचा ” स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार 2023″ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्मानीय श्री रमेश बैस यांच्या शुभ हस्ते सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी स्वामी रितवन भारती, स्वामी रामा साधक ग्राम, ऋषिकेश आणि पद्मश्री डॉ. डी. आर. कार्तिकेयन, माजी CBI Director या दोन मान्यवरांना प्रदान करण्यात आला.सर्वप्रथम राज्यपालांनी संस्थेच्या सान्दीपनी ग्रंथालय, दार्शनिक अनुसंधान विभाग आणि शास्त्रीय अनुसंधान विभागांस भेटी दिल्या.कार्यक्रमाची सुरुवात, राष्ट्रीय गीत, महाराष्ट्र गीत आणि शांती पाठाने करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्मानीय श्री रमेश बैस आणि कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांच्या शुभ हस्ते वैदिक मंत्राने दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर श्री सुबोध तिवारी यांनी सन्मानीय राज्यपाल यांचे शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन स्वागत केले. या नंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्मानीय श्री रमेश बैस यांच्या शुभ हस्ते स्वामी रितवन भारती, स्वामी रामा साधक ग्राम, ऋषिकेश आणि पद्मश्री डॉ. डी. आर. कार्तिकेयन, CBI चे माजी संचालक या दोन मान्यवरांना ” स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार 2023″ प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त स्वामी रितवन भारती आणि पद्मश्री डॉ. डी. आर. कार्तिकेयन यांनी आपली मनोगते व्यक्त केली,शेवटी राज्यपालांचे भाषण झाले. त्यांनी कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने करण्यात आली,कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी पी. दिव्या आणि श्री रामदास यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. रणजीत सिंग भोगल यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी केले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!