आरोग्य व शिक्षणमावळ

सरस्वती विद्यामंदिर मध्ये संस्कृतदिन उत्साहात साजरा..

नारळी पौर्णिमा या दिवशी भारतात व जगात संस्कृत दिन साजरा केला जातो..

Spread the love

सरस्वती विद्यामंदिर मध्ये संस्कृतदिन उत्साहात साजरा. Sanskrit Day is celebrated with enthusiasm in Saraswati Vidyamandir.नारळी पौर्णिमा या दिवशी भारतात व जगात संस्कृत दिन साजरा केला जातो.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३१ ऑगष्ट.

नारळी पौर्णिमा या दिवशी भारतात व जगात संस्कृत दिन साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून आज सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक विभागात संस्कृत दिन साजरा करण्यात आला.

संस्कृत शिक्षिका  सुनिता कुलकर्णी बाई यांनी संस्कृत मधून संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं .सूत्रसंचालन ते पसायदान पर्यंत सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांनीच संस्कृत मधून केला. संस्कृत नाटक, संस्कृत वार्ता, संस्कृत दिन माहिती, पसायदान, समूहगीत, वस्तूंचा संस्कृत मधून परिचय अतिशय उत्तम रीतीने सादरीकरण झाले. त्याबद्दल सुनीता कुलकर्णी बाई व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेश झेंड, उपाध्यक्ष  दिलीप कुलकर्णी , सदस्य डॉक्टर ज्योतीताई चोळकर व  विश्वास देशपांडे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  नवनाथ गाढवे , बालवाडी भाग प्रमुख  सोनाली काशीद आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित होते.उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत दिनाचे महत्त्व सांगितले सदस्य  विश्वास देशपांडे यांनी संस्कृत मधून आपले मनोगत व्यक्त केले तर मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी संस्कृत दिनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

इयत्ता दहावीतील सोहम एरंडे याने संस्कृत मधून संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले श्रावणी जगताप हिने संस्कृत मधून माहिती सांगितली. तर तनिष्का वढावकर या विद्यार्थिनीने संस्कृत मधून पसायदान सादर केले. सर्व कार्यक्रम इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केले.आठवीपासून त्यांना संस्कृत हा विषय सुरू होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!