आरोग्य व शिक्षणमावळ

सरस्वती शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक व शिक्षकेतरांचा विशेष सन्मान.

Spread the love

सरस्वती शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक व शिक्षकेतरांचा विशेष सन्मान.Special honor to teachers and non-teaching staff in Saraswati Education Institute.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, ५ सप्टेंबर.

सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे मध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक व शिक्षकेतरांना गौरविण्यात आले. याप्रसंगी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी ,शिक्षण समिती सदस्या डॉ.ज्योतीताई चोळकर , माजी कार्यवाह मा.  रमेश थिटे , सदस्य  विश्वास देशपांडे व सदस्य सुनिल आगळे तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  नवनाथ गाढवे, इंदोरी विभागाचे मुख्याध्यापक  नितीन शिंदे,बालवाडी विभाग प्रमुख. सोनाली काशिद. अनुराधा बेळणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व पदाधिकारी व जेष्ठ शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन झाले.

आजचा शिक्षक हा खऱ्या अर्थाने देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे शिक्षकांमुळेच डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, राजकीय नेते, समाजसेवक घडतात अशा गुरुजनांचा सन्मान सरस्वती शिक्षण संस्थेच्या वतीने आज शिक्षक दिनानिमित्त करण्यात आला.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये देणगीदार पुरस्कृत पारितोषिके बालवाडी शिक्षिका इंदोरी मंगला महाजन , प्राथमिक मुख्याध्यापक इंदोरी  नितीन शिंदे, प्राथमिक शिक्षिका तळेगाव अर्चना भोते, माध्यमिक शिक्षिका सुनिता कुलकर्णी, माध्यमिक मुख्याध्यापिका  रेखा परदेशी ,बालवाडी शिक्षिका तळेगाव अर्चना एरंडे, प्राथमिक शिक्षिका तळेगाव कु.अस्मिता ढावरे , माध्यमिक शिक्षक  संजय गायकवाड, व शिक्षकेतर कर्मचारी सुनिता शिंदे , सारिका जाधव यांना आदर्श शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

या कार्यक्रमात बक्षीसपात्र यादी वाचन  सुरेखा रासकर, अर्चना एरंडे,  मंगला महाजन,अस्मिता ढावरे.रत्नमाला भुजबळ, सविता केगंले, सोनल शेटे यांनी केले .
” शिक्षक हा सर्वात महत्त्वाचा घटक असून सर्व शिक्षक हे मोलाचे काम करत आहेत” असे संस्थेचे माजी कार्यवाह   रमेश थिटे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.व संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड यांनी सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.छाया सांगळे , प्रास्ताविक सरस्वती शिक्षण संस्थेचे  दिलीप कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षण समिती सदस्या डॉ.ज्योतीताई चोळकर यांनी केले. स्वागत गीत व पसायदान  कल्याणी जोशी यांनी तर इशस्तवन  सुनीता कुलकर्णी यांनी सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!