ताज्या घडामोडीमावळ

गोकुळाष्टमीनिमित्त मुरलीधर मंडळाच्या वतीने सुरेख सजावट केली..

Spread the love

गोकुळाष्टमीनिमित्त मुरलीधर मंडळाच्या वतीने सुरेख सजावट केली..On the occasion of Gokulashtami, beautiful decoration was done on behalf of Muralidhar Mandal..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ६ सप्टेंबर.

 

गोकुळाष्टमीनिमित्त मुरलीधर मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय सुरेख सजावट केलेली आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीमंत मुरलीधर मंडळ खळदे आळी, तळेगाव दाभाडे येथे  गोकुळाष्टमी निमित्त बुधवार दि.०६/०९/२०२३ पहाटे ५ वा.काकडा आरती व महापुजा संपन्न झाली,सकाळी १० ते दुपारी २ वा.मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच दुपारी ३ वा. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व तदनंतर भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून  रात्री १२ वा.  श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी आवाज न्यूज प्रतिनिधींना सांगितले.

मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून,मुरलीधर मंडळाच्या,संयोजकांतर्फे सर्व भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ घेण्याची विनंती  करण्यात आली आहे.

तसेच गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव सायंकाळी ५ वा.होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!