मावळसामाजिक

तळेगाव दाभाडे शहरात, गणेशोत्सव  पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन.. एन.के पाटील मुख्याधिकारी त.दा.न.प.

Spread the love

तळेगाव दाभाडे शहरात, गणेशोत्सव  पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन.. एन.के पाटील मुख्याधिकारी त.दा.न.प.In the town of Talegaon Dabhade, an appeal to celebrate Ganeshotsav in an environment-friendly way.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ८ सप्टेंबर.

आपल्या तळेगाव दाभाडे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा व्हावा यासाठी मा. मुख्याधिकारी एन.के. पाटील यांनी जास्तीत जास्त नागरिक व गणेशमंडळांना पर्यावरणपूरक गणेश मुर्तीची स्थापना करावी तसेच नगरपरिषदेने नियुक्त केलेल्या कर्मचारी यांचेकडे श्रीमुर्तीचे संकलन केंद्रावर दान करावे, पूजेतील निर्माल्य हे नैसर्गिक जलस्त्रोतात न विसर्जीत करता निर्माल्यासाठी नगरपरिषदेमार्फत पुरविणेत आलेल्या निर्माल्य कलशामध्येच संकलीत करावे, सजावटीतील साहित्याचे घंटागाडी किंवा नगरपरिषदेने नियुक्त केलेल्या निर्माल्य ट्रॅक्टरमध्ये संकलन करावे व गणेशोत्सवा दरम्यान पर्यावरणाला हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वर्षभरातील सर्व सण पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दि. १२/५/२०२० रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी वर्षभरातील सर्व सण पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करणे आवश्यक आहे. याबाबत सदरहू मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणेकरीता तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मा.मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेतील सक्षम अधिका-यांची व कर्मचा-यांची दि. २५ ऑगष्ट रोजी बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीमध्ये केंद्रशासनाचे स्वच्छ भारत अभियान व राज्यशासनाचे माझी वसुंधरा अभियान ४.० यांचे प्रभावी अंमलबजावणी करणेच्या हेतूने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक अश्या गणपतीमुतींची स्थापना करणे, घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन कृत्रीम तलावात करणे, त्याकरीता आवश्यक तेवढ्या कृत्रीम तलावांची निर्मिती करणे, सजावटीचे साहित्य, पुजेतील निर्माल्य, नैसर्गीक जलस्त्रोतात विसर्जीत न करता निर्माल्यासाठी निर्माल्य कलश योग्य ठिकाणी बसविणे तसेच घरोघरीचे व गणेशोत्सव मंडळांचे निर्माल्य संकलीत करणेसाठी गाव व स्टेशन भागात प्रत्येकी एक निर्माल्य ट्रॅक्टर दि. २०ते२५ सप्टेंबर या दरम्यान व आवश्यक त्या दिवशी (दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस व दहा दिवस) उपलब्ध करून देणेची योजना करणे तसेच संकलीत केलेल्या निर्माल्यातून सेंद्रीय खताची निर्मिती करणेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे, त्याचबरोबर सजावटीतील साहित्याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार शास्त्रोक्त पध्दतीने लावणे इत्यादींबाबत संबंधीतांना निर्देश देण्यात आले आहेत.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे जाहिर आवाहन, एन.के. पाटील मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांनी केले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!