महाराष्ट्र

कोव्हीडच्या प्रमाणपत्रावर लस शोधणार्‍या शास्त्रज्ञाचा फोटो हवा- पूर्व कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

Spread the love

तळेगाव : आज कोव्हीडच्या आजारामुळे मानवी जीवन दुःखी आहे .अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी लस शोधली त्यांचा सन्मान होण्याऐवजी एखाद्या भलत्याच माणसाचा फोटो लसीच्या प्रमाणपत्रावर येत असेल तर यासारखी धोक्याची बाब नाही. वास्तविक पाहता माणसांना जगवण्यासाठी ज्यांनी योगदान दिले आहे ,त्यांचे योगदान डावलून कोणी आपले फोटो छापत असतील तर ही शरमेची बाब आहे असे प्रतिपादन डॉ कोतापल्ले यांनी केले .

पंजाब येथे राष्ट्रीय सुवर्णपदक वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारत देशाच्या वतीने ,मावळ तालुक्याने सुवर्णपदक पटकावले याबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पूर्व कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या प्रसंगी ते बोलत होते.

इंद्रायणी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे .त्यांचा सत्कार समारंभ डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. चेतना घोजगे, सुवर्णपदक चिराग वागवले (सुवर्णपदक) रुचिका ढोरे,  हर्षदा गरुड,( रौप्य पदक)  अशी पदक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना डॉ. कोतापल्ले पुढे म्हणाले की, आज देशामध्ये सर्व क्षेत्रात गोरगरिबांची मुस्कटदाबी होत आहे .शिक्षणावर होणारा खर्च अत्यल्प आहे .स्त्रियांची कुचंबणा होत आहे . आज आपण कुठे चाललो आहोत .ज्ञानाच्या शाखा व स्त्रोत वाढत आहे. आणि हे सर्व होत असताना नव्या पिढीसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, तसेच अद्ययावत अभ्यासक्रम आले पाहिजे. खरं म्हणजे आज ज्ञानाचा जगभर विस्फोट होत आहे आपण कल्पना करू शकत नाही .हे संशोधक, तसेच खेळाडूंना योग्य प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मी स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये गेलो होतो ,त्या ठिकाणी एकाच विद्यापीठांमध्ये 9 नोबेल पुरस्कार विजेते होते .आणि मग असे विद्यापीठ असा देश का पुढे जाणार नाही .आपल्या देशामध्ये गुणवंतांचा सन्मान होत नाही. मुलांना चांगले चॉईस उपलब्ध करून दिले जात नाही. आपल्याकडे सरकार खेळाडूंसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देत नाही. पूर्वीच्या काळात शाहू महाराजांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हिंदकेसरी निर्माण झाले. आज आमचे लोक खेळाडूंचा फक्त सत्कार करायला पुढे पुढे जातात .पण तुम्ही त्यांच्यासाठी काय केले. हा चिंतेचा विषय आहे. खऱ्या अर्थाने ज्यांनी शोध लावले, ज्यांनी देशासाठी सुवर्णपदक पटकावले, अशांना सलाम करण्याऐवजी आम्ही आमचाच प्रचार करतो.आमचेच महत्त्व सांगतो ,आणि ही बाब देशासाठी निश्चितच मागे ओढणारी आहे .देशाला जर पुढे जायचं असेल तर खेळाडूंचा ,शास्त्रज्ञांचा आणि ज्यांचे ज्यांचे देश हितासाठी योगदान आहे त्यांचे महत्त्व व त्यांचे फोटो छापायला शिकले पाहिजे अशी भावना याप्रसंगी कुलगुरू यांनी व्यक्त केली .

तसेच याआधी देखील गोवर ,पोलिओ,स्वाइन फ्लू यांसारखे अनेक साथीचे आजार येऊन गेले, त्यावर देखील मोफत लसीकरण झाले परंतु तेथे कुठेही कोणाचे फोटो छापण्याचे ऐकिवात नाही.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना संस्थेचे सचिव श्री .चंद्रकांत शेटे यांनी सांगितले की, आम्ही संस्थेच्या माध्यमातून खेळाडूंसाठी इंडोर स्टेडियम आणि 400 मीटर ट्रॅक उपलब्ध करून देणार आहे . संस्थेच्या वतीने खेळाडूंसाठी सोयी सुविधा नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहे. तसेच पाच मजली भव्य इमारत याठिकाणी उभी राहणार आहे .यापूर्वी शिवछत्रपती पुरस्कार संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला आहे .अशाच प्रकारचे योगदान पुढे राहील असा आम्हाला विश्वास आहे .

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी केले .तसेच विद्यार्थ्यांच्या या यशासाठी प्रशिक्षक म्हणून प्रा. दुबे यांचे देखील योगदान बहुमूल्य आहे . त्यांनी आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले .संस्थेचे महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. परेश पारेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के.व्ही.अडसूळ यांनी केले .तर आभार प्रदर्शन प्रा. सुरेश थरकुडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी फार्मसीचे प्राचार्य डॉ.बी.बी जैन हे उपस्थित होते .कार्यक्रमाला प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .सर्वांनी विद्यार्थ्यांना पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!