आरोग्य व शिक्षण

सचिन घोटकुले यांच्यावतीने रक्षाबंधन निमित्त आदिवासी वस्तीसाठी गिरणी भेट

Spread the love

चावसर : पै.सचिन घोटकुले (जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांनी मावळ मधील अतिदुर्गम भागातील चावसर येथिल कोटमवाडी आदिवासी वस्तीवर जाऊन रक्षाबंधन उत्सव साजरा करून संपुर्ण आदिवासी वस्तीसाठी गिरणी भेट दिली.

कोटमवाडी जवळपास दोनशे लोकवस्ती असलेली वाडी आहे. या ठिकाणी पै.सचिनभाऊ घोटकुले यांनी अचानक भेट देऊन येथिल भगीनींसमवेत रक्षाबंधन साजरे केले.  त्यांना गिरणी भेट दिली. तसेच सर्वांना मिठाई वाटप करण्यात आली.

यावेळी या महिलांना आनंदाश्रू अनावर झाले. या पावसामधे आमचा भाऊ आम्हाला भेटायला आला याचे आम्हाला समाधान वाटले.तसेच भर पावसामधे आम्हाला दळण दळण्यासाठी गावात जावे लागत असे. पण भाऊंनी आम्हाला पिठगिरणी भेट देऊन आमची अडचण सोडवली त्याबद्दल भाऊंचे मनापासून आभारी आहे.अश्या भावना व्यक्त करत  सर्व महिलांनी सचिन घोटकुले यांना औक्षण करून राखी बांधली.

.यावेळी वसंत तुपे,आत्माराम शिंदे ,उमेश केदारी,काळु उंबरकर,सखाराम पवार ,शंकर मोहोळ,शेखर जगताप,संजय यादव,अक्षय धनवे व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!