आंदोलनमहाराष्ट्रमावळ

सोमाटण्यातील युवकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचे मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन..

मावळचे आमदार शेळके व खासदार बारणे देखील उपस्थित.

Spread the love

सोमाटण्यातील युवकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचे मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन, मावळचे आमदार शेळके व खासदार बारणे देखील उपस्थित.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १४ सप्टेंबर.

मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी मावळ तालुक्यातील नरेंद्र मुन्हे, निखिल मुहे, स्वप्निल मुहे हे तीन युवक रविवारी दिनांक १० सप्टेंबर रोजी सोमाटणे येथून पायी प्रवास करत मुंबईच्या दिशेने निघाले होते. हे तिघेही जण आज (बुधवार, दिनांक १३ सप्टेंबर) रोजी मुंबई येथे  पोहोचले. त्यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी ह्या युवकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट करुन दिली.

यावेळी तिघांनीही मराठा आरक्षणासंदर्भातील समाज बांधवांच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. तसेच त्यांनी मागणीचे निवेदनपत्रही दिले. मुख्यमंत्र्यांनीही यावेळी, सरकार सकारात्मक भावनेने आणि जलदगतीने सदर विषयावर काम करत असल्याचे सांगितले.

मराठा समाजाच्या भावनांचा विचार करुन राज्य सरकार लवकरच न्याय देईल, अशी आशा बाळगतो’. आमदार सुनिल शेळके.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!