आंदोलनमहाराष्ट्रसामाजिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उपस्थित राहून जरांगेना दिले आश्वासन.

तुम्ही काळजी करू नका, जीव गेला तरी चालेल पण तुमच्या पदरात आरक्षणच टाकील - जरांगे पाटील

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उपस्थित राहून जरांगेना दिले आश्वासन ; तुंम्ही काळजी करू नका, जीव गेला तरी चालेल पण तुमच्या पदरात आरक्षणच टाकील – जरांगे पाटील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उपस्थित राहून जरांगेना दिले आश्वासन.

आवाज न्यूज : विशेष वार्ताहर, १४ सप्टेंबर.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दहा मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत काय बोलणं झालं. याबाबत जरांगे पाटील यांनी माहिती दिली. आपण मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहोत. एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण सोडण्यासाठी चर्चा केल्याची पहिलीच घटना आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचं अभिनंदन, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात केली.

सरकारला मोठ्या मनाने वेळ दिला. समाजाच्या वतीने आणखी दहा दिवस देतो फक्त आरक्षण द्या. जीव गेला तरी चालेल पण तुमच्या पदरात आरक्षणच टाकील. माझ्या बापाच्या कष्टाचं खाऊन समाजाचं काम करतो. मी तुमच्या प्रश्नावर एक इंचही मागे हटणार नाही. मी शिंदेंना येथे आणूनच दाखवलं. तुम्ही कसलीही काळजी करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. शिंदे साहेबांच्या मागेच लागणार आहे. त्यांनाही माहिती आहे. कारण, एकनाथ शिंदे हेच आपल्याला आरक्षण देऊ शकतात अशी माझी खात्री आहे, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

१७ व्या दिवशी जरांगे यांचं उपोषण मागे
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागच्या १७ दिवसांपासून उपोषण करत होते. त्यांनी सरकार समोर पाच अटी ठेवल्या होत्या. या अटींची पूर्तता करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उपस्थित राहून आपल्याला आश्वासन द्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित राहत मनोज जरांगे पाटील यांना आणि मराठा समाजाला आश्वस्त केलं आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस घेत जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणत शिंदे यांनी आपल्या संबोधनाला सुरूवात केली. यावेळी मीही सामान्य कुटुंबातून आलेलो आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करत राहील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!