मावळसामाजिक

औंढेखुर्द येथे संपर्क बालग्रामतर्फे सुमारे ७५ ग्रामस्थांची मोफत नेञतपासणी..

Spread the love

औंढेखुर्द येथे संपर्क बालग्रामतर्फे सुमारे ७५ ग्रामस्थांची मोफत नेञतपासणी ; पंचायत समितीचे सी.डी.पी.ओ यांची हजेरी.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, १४ सप्टेंबर.

औंढेखुर्द येथे संपर्क बालग्रामतर्फे सुमारे ७५ ग्रामस्थांची मोफत नेञतपासणी; पंचायत समितीचे सी.डी.पी.ओ विशाल कोतागडे आणि पंचायत समितीचे कक्ष आधिकारी विठ्ठल भोयर यांनी भेट दिली. औढेखुर्द येथील बंद उपकेँद्राबाबत एका ज्येष्ठ महिलेने प्रश्न विचारून पंचायत समिती अधिकारी यांना केले निरूत्तर..

यावेळी संपर्क बालग्रामचे फिरता दवाखाना अंतर्गत औंढेखुर्द गावात श्रीदत्तमंदिराजवळ सुमारे ७५ पन्नास वर्षावरील महिला , पुरूष यांची मोफत नेञतपासणी करण्यात आली.
यावेळी त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून सरपंच अरूण चव्हाण , ग्रामविकास आधिकारी आर .एस.जोशी यांनी तसेच ग्रामपंचायत सदस्या.सुरेखा किरण केदारी, ज्येष्ठ ग्रामस्थ पांडुरंग निकम, अंगणवाडी सेविका व आशाताई यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायत ग्रामविकास आधिकारी.जोशी यांनी प्रास्ताविक केले.

संपर्क संस्थेचे वैद्यकीय आधिकारी डाॕ.प्रशांत वेखंडे , नेञरोगतज्ञ डाॕ.शिवाजी मोहिते , सिस्टर रोज मेरी , अंगणवाडी सेविका. कविता मांडेकर, आनिता केदारी,आशाताई छाया शेवाळे, अंजना जांभूळकर , ग्रामपंचायतीचे लिपिक सोमनाथ आहेरे, गणेश शेंडे, कर्मचारी मोरेश्वर मांडेकर, कार्तिक जगताप, डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे सेवानिवृत्त लिपिक पोपट रोकडे, तसेच गावातील ज्येष्ठ रेल्वेचे सेवानिवृत्त कामगार किसन नाणेकर , लक्ष्मण शेळके आदि उपस्थित होते.

यावेळी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी म्हणाले , संपर्कबालग्रामतर्फे चालविल्या जाणाऱ्या  मोफत फिरता दवाखान्यात असलेले वैद्यकीय अधिकारी डाॕ.प्रशांत वेखंडे यांचेशी सात आठ महिन्यापूर्वी संपर्क झाला.त्यांना डाॕ.आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळालेला आहे.त्यांनी समाजाची प्रामाणिकपणे सेवा केल्याचे हे फळ.
औंढेखुर्द गावात ७०चेवर लोकांची डोळ्यांचे आरोग्य तपासणी केली, यामधे ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे.
कालच एक दुर्घटना घडल्याचे समोर आले. एका पीएचसीमधे एक ग्रामिण भागातील महिला उपचारासाठी आली ; पण तिला आणायला व उपचार यामधे मधला पिरियड जास्त गेल्याने ती दुर्दैवाने दगावली. असे व्हायला नको होते, त्यामुळे संपर्क संस्थेला विनंती करतो, की याभागात जशी सेवा देता, तशी पलीकडे आंदरमावळ भागात आदिवासी भागात तसेच पवनमावळ भागातही सत्तर ऐंशी गावे आहेत, तिथे ही सुविधा पोहोचली , तर फार बरे होईल.

यावेळी गावातील श्रीमती रसाळ या महिलेने आधिकारी यांना खडे बोल सुनावले, ती म्हणाली, आपण सरपंच लोकांना, आमदार, खासदारांना कशाला निवडून देतो ? कशाशासाठी ?  कोणती अचानक घटना घडली , तर गावात दवाखाना नसेल, तर महिलांनी कुठे जायचे ! हे पूल असे आहे, पुलावरून महिलेला डिलीवरीसाठी न्यायचे , तर त्यासाठी तिला पैसे पाहिजे ! नसेल तर तिने खोंड घालून मरायचे का ?  असा प्रश्न उपस्थित करत ती म्हणाली , माझा मुलगाही दवाखान्यात कामाला होता.आमच्या औंढ्यातला दवाखाना किती महिने बंद आहे, तो चालू करा, डाँक्टर नेमा.

यानंतर सर्वच अवाक झाले. सीडीपीओ साहेब यांनी भाषण करायचे व सत्कार स्विकारण्यास नकार दिला.
यावेळी संपर्कबालग्रामतर्फे डाॕ.वेखंडे म्हणाले, सर्व ग्रामस्थांतर्फे आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार. ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी.जोशी साहेब , पंचायत समितीचे महिला व बालकल्याण विभागाचे सीडीपीओ.कोतागडेसाहेब, कक्ष अधिकारी.भोयर साहेब तसेच अंगणवाडी सेविका , आशाताई, आमचे डाॕक्टर मोहिते व रोज मेरीसिस्टर यांचेही आभार मानले.

डाॕ.वेखंडे पुढे म्हणाले ,” जो असे कँम्प आयोजित करतो, त्याला कळते यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात..त्यामुळे सर्वांनी शिबीर यशस्वीपणे राबविल्याबद्दल आभार मानतो.यावेळी सूञसंचालन व आभार ग्रामविकास आधिकारी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!