अध्यात्मिकमावळसामाजिक

तळेगाव दाभाडे श्री.गणेशोत्सव मंडळाच्या मीटिंगचे आयोजन.. सत्यवान माने,वरिष्ठ पोलीस निरीक्षक.

दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, सुशीला मंगल कार्यालय लिंब फाटा.

Spread the love

तळेगाव दाभाडे श्री.गणेशोत्सव मंडळाच्या मीटिंगचे आयोजन .. सत्यवान माने. वरिष्ठ पोलीस निरीक्षक.Talegaon Dabhade Mr. Ganeshotsav Mandal meeting will be concluded.. Satyawan Mane. Senior Police Inspector.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, १४: सप्टेंबर.

यंदाच्या गणेशोत्सवाची १९ सप्टेंबर पासून सुरुवात होणार असुन, सर्वत्र गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव मंडळाची मीटिंग दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, सुशीला मंगल कार्यालय लिंब फाटा तळेगाव दाभाडे, येथे  संपन्न होणार असून, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व श्री गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याची सुचना सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांच्या मार्फत करण्यात आली आहे.

सदर मीटिंग करिता येताना सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी परवानगीचे फॉर्म घेऊन यायचे आहे, मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना तेथेच परवानगी देण्यात येणार आहे याची सर्व मंडळाचे पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी.

सत्यवान माने.. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!