आरोग्य व शिक्षण

वैकुंठवासी मृदूंगाचार्य दत्तोबा महाराज शेटे पुण्यस्मरणानिमित गुणवंत शिक्षक व वारकरी यांचा सत्कार

Spread the love

लोणावळा : गुरूपोर्णिमा व वैकुंठवासी मृदूंगाचार्य दत्तोबा महाराज शेटे यांच्या १४ वे पुण्यस्मरणानिमित गुणवंत वारकरी व शिक्षक यांचा माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे आणि मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्ष नरहरी महाराज केदारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सकाळी दिपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

वारकरी भूषण हा पुरस्कार उद्योजक व वारकरी नंदकुमार सोनू वाळंज ( आंबवणे) आणि ह.भ.प.भंडारा डोंगर दशमी समिती पदाधिकारी ह.भ.प.मनोहरपंत ढमाले ( तळेगाव दाभाडे ) यांना मान्यवर यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला.सेवाधाम आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रमिलाताई भालके आणि बुधवडी येथील पदवीधर शिक्षक जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक सुहास कुंडलीक धस यांना गुणवंत गुरूजन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे , भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार , मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष नरहरी महाराज केदारी , नवलाख उंबरेचे माजी सरपंच दत्ताञेय पडवळ, पञकार तात्या धांडे , आंबळे निगडेच्या सरपंच सविता भांगरे, समाजभूषण धोंडिबा घोजगे , पैलवान दत्ताञेय घोटकुले , ह.भ.प.विष्णू सावंत , ताजेचे पोलिसपाटील अरूण केदारी , उद्योजक मोहन जंजीरे , उद्योजक किशोर भेगडे , कान्हेचे पोलिसपाटील शांताराम सातकर , साळुंब्रे विकास सोसायटी चेअरमन निलेश तथा सागर राक्षे , नाथाशेठ घुले व कातवी देवस्थान अध्यक्ष दयानंद गायकवाड आणि ह.भ.प.काशिनाथ मोरमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी झी युवा संगीत सम्राट फेम अश्विनी मिठे यांचा ‘संगीत संतवाणी’ हा कार्यक्रम तबलासाथ सागर सोरटे , समीर मोरमारे आणि प्रविण कुलकर्णी यांचे साथीने संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन मावळभूषण भजनसम्राट साम टीव्ही , झी टाॕकीज, मायबोली मराठी व शेमारू मराठी बाणा वरील किर्तन साथसंगत गायक नंदकुमार दत्तोबा शेटे आणि भजन गायिका सौ.आशाताई नंदकुमार शेटे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूञसंचालन व नियोजन उद्योजक श्रीकांत भेगडे आणि ढमाले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!