मावळसामाजिक

तळेगाव पोलिस ठाण्याच्या बीट शाखेचे उद्घाटन.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे परिमंडळ दोनचे आयुक्त काकासाहेब डोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Spread the love

तळेगाव पोलिस ठाण्याच्या बीट शाखेचे उद्घाटन ; पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे परिमंडळ दोनचे आयुक्त काकासाहेब डोळे यांच्या हस्ते करण्यात आले.Inauguration of Beat Branch of Talegaon Police Station; Pimpri Chinchwad Police Commissionerate Circle Two Commissioner Kakasaheb Aje.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, १९ सप्टेंबर.

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या दुसऱ्या बीट शाखेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे परिमंडळ दोनचे आयुक्त काकासाहेब डोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

तळेगाव दाभाडे शहराची वाढती लोकसंख्या व वाढती नागरिकरण तसेच, तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे मुंबई-पुणे महामार्ग लगत असल्याने या ठिकाणी येऊन तक्रारी देणे नागरिकांना अत्यंत कठीण जात असे. तसेच तळेगाव गावठाण भागातील शांतता व सुव्यवस्था राहावी या दृष्टीने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याकडून बीट नंबर दोन ही चौकी जिजामाता चौक येथे सुरू करण्यात आली आहे. या वेळी देहूरोड परिमंडल २ चे  सहायक उपायुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, महिला दक्षता कमिटीच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेवक अरुण माने, मुन्ना मोरे, संतोष परदेशी, सह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!