आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

सातव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी १२ वा.पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी.

डॉ राजेश देशमुख, जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश..

Spread the love

सातव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी १२ वा.पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी.On the seventh day, the use of loudspeakers and loudspeakers is allowed till 12 o’clock for Ganesh Visarjan procession.

आवाज न्यूज : श्रेयश परदेशी पुणे प्रतिनिधी, २२ सप्टेंबर.

गणपती उत्सवासाठी सन २०२३ साठी निश्चित केलेले दिवस. शनिवार दि. २३/०९/२०२३गणेशोत्सव सन २०२३ पाचवा दिवस (गौरी ०४ दिवस विसर्जन) दि. २४/०९/२०२३ सहावा दिवस रविवार मंगळवार दि. २६/०९/२०२३ आठवा दिवस,अ बुधवार गुरुवार दि. २८/०९/२०२३ दहावा दिवस (अनंत चतुर्दशी)दि. २७/०९/२०२३नववा दिवस, ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशी पाच दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती.

आता नव्याने सोमवार २५ सप्टेंबर २०२३ (सातवा दिवस) सह एकूण सहा दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ज्याअर्थी, केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) अन्वये सुधारीत अधिसूचना निर्गमित केली असून, त्यामध्ये सण उत्सव कालावधीसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापराबाबत एकूण १५ दिवसांसाठी सूट दिली असून त्यानुसार फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६-०० वाजल्यापासून रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक याचा वापर करता येईल अशी तरतुद केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, या कार्यालयाचे आदेश क्र. पगक/ कावि/ ८७५/२०२३, दि.१६/०२ / २०२३ अन्वये पुणे जिल्हयासाठी सन २०२३ मधील उत्सवाकरिता एकूण १५ दिवसापैकी विविध सणांसाठी १३ दिवस देवून २ दिवस राखीव ठेवलेले आहेत. त्यामध्ये सन २०२३ चे सार्वजनिक गणेशोत्सवाकरीता खालील ०५ दिवस निश्चित करण्यात आणि ज्याअर्थी, वेळोवेळी विविध लोकप्रतिनिधी व गणपती मंडळे यांनी पुणे शहरात आणि जिल्हयात सार्वजनिक गणपती उत्सवामधील सातव्या दिवशी गणपती विसर्जन केले जात असल्याने दि. २५/०९/२०२३ रोजी नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने एक विशेष बाब म्हणून आणखी १ दिवस वाढवून मिळण्याची समक्ष विनंती केली आहे.

आणि ज्याअर्थी, वाचले क्र. ४ अन्वये पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गणपती विसर्जनाचा सातवा दिवस असल्याने एक विशेष बाब म्हणून दि. २५/०९/२०२३ रोजी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापरास सकाळी ६:०० वाजल्यापासून रात्री १२:०० वाजेपर्यंत परवानगी देण्यास हरकतीचे नाही असे कळविले आहे.  डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार ध्वनी प्रदुषण(नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) नूसार वाचा क्र. ३ च्या आदेशातील राखीव असलेल्या दोन दिवसांपैकी खालील नमूद ०१ दिवस सकाळी ६:०० वाजल्यापासून रात्री १२:०० वाजेपर्यत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापराकरीता गणपती उत्सवासाठी देण्यात येत आहेत.

तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात सातव्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते. तळेगाव शहरात विसर्जन मिरवणुका काढल्या जातात. मानाचे गणपती येऊन त्यांची मिरवणूक काढण्यासाठी रात्री उशीर होतो.सातव्या दिवशी रात्री दहा पर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी असल्याने गणेश भक्तांचा उत्साह काहीसा कमी झाला होता. त्यानंतर गणेश मंडळे आणि आमदार सुनील शेळके यांनी देखील जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सातव्या दिवशी रात्री बारा पर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. सातव्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी  दिल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!