देहूरोड कॅन्टोन्मेंटसामाजिक

देहूरोड येथील मैञेय फोटो स्टुडिओला आग..

साहित्य जळून झाले खाक.

Spread the love

देहूरोड येथील मैञेय फोटो स्टुडिओला आग, साहित्य जळून झाले खाक.A fire broke out at Mainey photo studio in Dehurod, materials were burnt.

आवाज न्यूज : देहूरोड प्रतिनिधी, २२ सप्टेंबर.

देहूरोड श्री शिवाजी विद्यालय समोरील मेहता पार्क मधील मैत्रेय डिजिटल फोटो स्टुडिओला आग लागून आतील साहित्य जळून खाक झाले. ही घटना २१ रोजी मंगळवारी सकाळी सात वाजता घडली. फोटो स्टुडिओला आग लागल्याने शेजारच्यांनी त्वरित फोटो स्टुडिओ दुकान चालक प्रदीप गायकवाड यांना भ्रमणध्वनी वरून कळविले . चालक प्रदीप गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदती साठी कॅन्टोन्मेंट बोर्डाला कळविले. कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्वरित अग्निशामक दलाचे वाहन पाठवून आग आटोक्यात आणले. तसेच आगीची घटना देहूरोड पोलीस स्टेशनला कळविण्यात आल्याने देहुरोड पोलीस स्टेशनचे पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

या आगीत तीन ते साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे .त्यात दोन कॅमेरा दोन संगणक दोन फ्लेक्स फर्निचर दोन फोकस लाईट, परदा, टेबल असे साहित्य जळून खाक झाले. ही घटना देहूरोड फोटोग्राफर असोसिएशनच्या संघटनेला कळाल्यानंतर फोटो ग्राफर असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष बाबू टेक्केल व त्यांच्या सहकारी व सर्व पदाधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन फोटो स्टुडिओचे मालक प्रदीप लक्ष्मण गायकवाड यांना धीर दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!