ताज्या घडामोडीनगरपरिषदमावळ

तळेगाव नगरपरिषदेमध्ये एजंट लोकांची रेलचेल- योगेश पारगे

Spread the love

तळेगाव नगरपरिषदेमध्ये एजंट लोकांची रेलचेल- योगेश पारगे.Agents in Talegaon Municipal Council – Yogesh Parge.

आवाज न्यूज ; तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३ ऑक्टोबर.

तळेगाव दाभाडे नगर परिषदे मध्ये काही दिवसांपूर्वी एका शासकीय श्री कणसे नामक कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती , सदर कर्मचारी हा नगरपरिषदेतील एका बड्या अधिकाऱ्यासाठी वसुली करीत असल्याची चर्चा तळेगाव शहरात रंगली होती. परंतु नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात काही एजंट दिवसभर तळ मांडून बसत असल्याची चर्चा नगर परिषदेमध्ये रंगलेली आहे. सदर एजंट हे राजकीय आहेत की आर्थिक आहेत याबाबतचा खुलासा होऊ शकला नाही परंतु एजंट दिवसभर तळ मांडून बसत असल्याची चर्चा सध्यातरी जोरदार रंगलेली आहे.
कुठलेही राजकीय अथवा आर्थिक एजंट दिसल्यास त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी चोप द्यावा असे आवाहन तळेगाव शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष योगेश पारगे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!