पिंपरी चिंचवडसामाजिक

डिफेंस फोर्स लीग आणि DFL क्रिपटो टेक्नॉलॉजी तर्फे परमवीरचक्र सुबेदार मेजर संजय कुमार यांचा उपस्थितीत एल्प्रो मॉल ऑडिटोरियम.चिंचवड मध्ये भारतीय वायुसेना दिन व दिवाईन कल्चर फेस्टिवल साजरा करण्यात आला.

Spread the love

डिफेंस फोर्स लीग आणि DFL क्रिपटो टेक्नॉलॉजी तर्फे परमवीरचक्र सुबेदार मेजर संजय कुमार यांचा उपस्थितीत एल्प्रो मॉल ऑडिटोरियम, चिंचवड मध्ये भारतीय वायुसेना दिन व दिवाईन कल्चर फेस्टिवल साजरा करण्यात आला.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत.

डिफेंस फोर्स लीग व DFL क्रिपटो टेक्नॉलॉजी तर्फे ८ ऑक्टोबर ला येणाऱ्या भारतीय वायुसेना दिनानिमित्त एल्प्रो मॉल ऑडिटोरियम पिंपरी चिंचवड मध्ये कल्चर फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भारताचे परमवीर चक्र विजेते सुबेदार मेजर संजय कुमार यांचा प्रमुख उपस्थितीत भारतीय वायुसेनेचे दिग्गज व विद्यार्थ्यांचा समारोह पार पडला. या महोत्सवात सकाळी ६ युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी नृत्य, गायन, चित्रकला, फॅशन शो व डिवाईन जूनियर मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होते. भारतीय सैन्याचे प्रश्न संहित अनोख्या ब्युटि कोंटेस्ट मध्ये विद्यार्थिनींनी शूरवीरांना नमन केले. DFL ग्रुप चे संस्थापक  नरेश गोल्ला, डिफेंस फोर्स लीग चे प्रेसिडेंट एक्स पैरा कमांडो रघुनाथ सावंत, DFL क्रिपटो टेक्नॉलॉजी चे डायरेक्टर श्री राजेंद्र जाधव व एक्स सुबेदार मेजर यशवंत महाडीक यांनी परमवीरचक्र सुबेदार मेजर संजय कुमार यांचे स्वागत केले . वायुसेनेचे दिग्गज एयर कोमोडोर सुरेन्द्र त्यागी (वायुसेना मेडल) , ग्रुप कॅप्टन हेमंत सरदेसाई (विरचक्र) यांचासमवेत एलप्रो मॉल चे चेअरमन दीपक शर्मा, प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटीचे डॉ. नंदकिशोर एकबोटे, डॉ तनप्रीत कौर मेहता, नीलेश नेवाळे, कर्नल प्रशांत काकडे, एयर वेटेरन्स असोसिएशन चे JWO शरदचंद्र फाटक, श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट चे संजीव जावळे, एक्स सुबेदार झगडे, कर्नल एल एम साठे ग्रीन थंब फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्ट, श्री बालाजी यूनिवर्सिटी पुणे, डॉ. डि वाय पाटील आर्ट्स कॉलेज पिंपरी, OCA चे डॉ. अमित कुमार दुबे, लक्ष अकॅडेमी, ADCI व इतर संस्थांना “परमवीरचक्र सुबेदार मेजर संजय कुमार प्राइड अवॉर्ड” देण्यात आला. यावेळी फेस्टिवल मधे स्पर्धेत PCCOE कॉलेज, रामकृष्ण मोरे कॉलेज, डी वाय पाटील यूनिवर्सिटी, सीमबायोसिस स्किल्स प्रोफेशनल यूनिवर्सिटी, ASM CSIT कॉलेज, प्रतिभा ग्रुप इंस्टीट्यूट चे विद्यार्थी सहभागी होते.

कार्यक्रमात APML चे संस्थापक रमेश अग्रवाल समवेत भारतीय वायुसेनेचा वीरांना आणि शालेय संस्थांना हिंदुस्तान प्राइड अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात ऑफिसर करियर अकॅडेमी च्या कडेट्स ने एयर फोर्स ड्रिल सादर केले, राईफल ॲक्ट बघून प्रेक्षक रोमांचित झाले होते.
जूनियर मिस इंडिया स्पर्धांचे परीक्षण प्रशांत भांगळे, सुनील कदम यांनी केले, गायन स्पर्धेचे परीक्षण स्मिता देशमुख यांनी केले.

परमवीरचक्र सुबेदार मेजर संजय कुमार यांनी आर्मी , नेव्ही, एयर फोर्स वेटेरन्स, पैरा कमांडो, नागरिक व कॉलेज आणि शालेय विद्यार्थी यांना एक मंचावर सहभागी करून कार्यक्रम करण्यासाठी डिफेंस फोर्स लीग जे कार्य करत आहे त्यास शुभेच्छा दिल्या. त्यांनी DFL व PCET इन्फिनिटी रेडियो वरचा KNOW YOUR ARMY सिरिज चे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की “दिल मे हिंदुस्तान हो तो कही भी जाओ देशभक्ती का काम करोगे”. पुणे जिल्ह्यातील शालेय संस्था व अकॅडेमी राष्ट्रहितास प्राधान्य देतात असे त्यांनी कौतुक केले.

सूत्रसंचालन नीलेश विसपुते, निखिल अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन DFL टेक्नॉलॉजी व डिफेंस फोर्स लीग चे श्री नरेश गोल्ला, रघुनाथ सावंत, यशवंत महाडीक, राजेंद्र जाधव, सिददाराम बिराजदार, अजय खोमणे, दृष्टी जैन , सुनील वडमारे, मुजीब खान, संदीप कांबळे, ऋषिकेश जाधव, दीपक मेंघाणी, शरडचन्द्र फाटक, रोहित अग्रवाल, निर्वाण गोल्ला, राज गोल्ला, विनोद शिंदे यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!