Puneकृषीवार्तामावळ

नैसर्गिक फुलांचा वापर करा डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरु म.फु.कृ.वि.राहुरी..

Spread the love

नैसर्गिक फुलांचा वापर करा डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरु म.फु.कृ.वि.राहुरी,Use natural flowers. Prashant Kumar Patil, Vice-Chancellor M.F.C.V.Rahuri

आवाज न्यूज : श्रेयश परदेशी पुणे प्रतिनिधी, ३ ऑक्टोबर.

फुल उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी आणि खाजगी गुंतवणुकदार यांचेसाठी मॅग्नेट प्रकल्प पुणे अंतर्गत राष्ट्रीय सुगी पाश्चात्त्य तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे येथे फुलपिकांचे काढणी पश्चात व्यवस्थापन या विषयावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व राष्ट्रीय सुगी पाश्चात्त्य तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे यांचे संयुक्त विद्यमाने दि. 3 व 4 आक्टोंबर 2023 या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरु म.फु.कृ.वि.राहुरी यांचे शुभ हस्ते झाले .या प्रसंगी  विनायक कोकरे, प्रकल्प संचालक मॅग्नेट पुणे, डॉ. अमोल यादव अतिरिक्त प्रकल्प संचालक मॅग्नेट पुणे डॉ. सुनिल मासाळकर सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय पुणे डॉ. रविंद्र बनसोड सहयोगी संशोधन संचालक व डॉ सुभाष घुले संचालक एनआयपीएचटी संस्था उपस्थित होते. सदर प्रशिक्षणास महाराष्ट्रातील विविध जिल्हयातुन 55 फुल उत्पादक शेतक-यांनी सहभाग घेतला आहे.

या कार्यक्रमाची प्रस्तावना व आखिल भारतीय समन्वित पुष्प संशोधन प्रकल्प, गणेश खिंड पुणे बाबत सविस्तर माहिती डॉ. रविंद्र बनसोड यांनी दिली. सदर प्रशिक्षणात उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरु म.फु.कृ.वि.राहुरी यांनी सर्व प्रशिक्षणार्थीचे स्वागत केले व प्लास्टीक पासून तयार करण्यात आलेल्या फुलांचा वापर कमी करण्यात यावा. तसेच फुलांमध्ये असलेले रंग, सुवासिक द्रव्य प्रक्रियेद्वारे तयार करुन तसेच सुकवलेली फुले तयार करुन मुल्यवर्धन करण्याचे सुचित केले. विनायक कोकरे प्रकल्प संचालक मॅग्नेट पुणे यांनी प्रशिक्षणामध्ये फुल प्रक्षेत्र भेटीचे महत्व तसेच फुलांचे विक्री व्यवस्थापन चांगले करावे याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. अमोल यादव अतिरिक्त प्रकल्प संचालक मॅग्नेट पुणे यांनी मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत घेतल्या जाणा-या विविध प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली.

 

सदर दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना फुल पिकांसाठी वापरण्यात येणा-या उत्तम शेती पध्दती, खत, पाणी किड व रोग व्यवस्थापन, फुल पिकांचे काढणी पश्चात व्यवस्थापन व प्रक्रिया व विक्री व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थीची दिनांक 04 आक्टोंबर 2023 रोजी आखिल भारतीय समन्वित पुष्प संशोधन प्रकल्प, गणेश खिंड पुणे येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन केलेले आहे.

या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. विष्णु गरांडे व डॉ. सुभाष भालेकर सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या यांनी काम केले. सदर कार्यक्रमास मॅग्नेट प्रकल्प पुणे व एनआयपीएचटी चे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एनआयपीएचटीचे  विश्वास जाधव व आभार प्रदर्शन डॉसुभाष घुले संचालक यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!