मावळलोणावळा

श्री भरत आगरवाल पतसंस्थेचे नवीन जागेत स्थलांतर..

उद्घाटनासाठी माजीमंञी, आमदारांची हजेरी.

Spread the love

श्री भरत आगरवाल पतसंस्थेचे नवीन जागेत स्थलांतर ; उद्घाटनासाठी माजीमंञी, आमदारांची हजेरी.Attendance of former MPs and MLAs for the inauguration.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी ३ ऑक्टोबर.

श्री भरत आगरवाल पतसंस्थेचे नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले.लोणावळा मुख्यशाखा उद्घाटनासाठी माजीमंञी बाळा तथा संजय भेगडे व मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. संस्थेने यावेळी माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. यावेळी सभासदांना १५टक्के लाभांश वाटपाची घोषणा करण्यात आली.
यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा. लता भरतशेठ आगरवाल, उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी, तसेच सर्व संचालक, संचालिका आणि व्यवस्थापिका, कर्मचारी, दैनंदिन प्रतिनिधी, तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी भाजपचे माजी उपनगराध्यक्ष, श्रीधर पुजारी, भाजपचे शहराध्यक्ष आरूण लाड, लोणावळा सहकारी बँकेचे संचालक भरतशेठ टकले, आजी, माजी संचालक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजीमंञी बाळाभाऊ भेगडे यांनी पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.सुमिञा सभागृहात झालेल्या छोट्या कार्यक्रमात मावळचे आमदार.  सुनिलआण्णा शेळके म्हणाले, स्व.भरतशेठ आगरवाल यांनी लावलेल्या या पतसंस्थेचा वटवृक्ष झालेला पहात आहोत. लताभाभी आगरवाल यांचे अध्यक्षतेखाली गेली अनेक वर्षे ही पतसंस्था गोरगरीब जनता, लहानमोठे व्यवसायिक यांचे कर्जाची सोय करून समाजाला हातभार लावत आहेत.

 

यावेळी तळेगवचे माजी नगराध्यक्ष व हिंदविजय पतसंस्थेचे संस्थापक यांनीही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.भरतशेठ आगरवाल यांचे आठवणींना उजाळा दिला. पतसंस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी पतसंस्थेच्या वतीनै सुमिञा सभागृहात आयोजित सत्कार समारंभात मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे हस्ते दिपप्रज्वलन व कै.भरतशेठ आगरवाल यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी आमदार.शेळके यांनी संस्थेच्या ठेवी, कर्जवाटपाचा आकडा पाहून संस्था गोरगरीब व्यवसायिक यांचेसाठी मदतीचा हात पुढे करीत असल्याचे समाधान व्यक्त केले.भविष्यात संस्थेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे अश्वासन देतो, असे ते म्हणाले.
यावेळी सहकार क्षेत्रातील शिक्षक.निंबळे यांनी एनपी ए सर्वात कमी राखल्याबद्दल संस्थेचे आभार मानून कर्जवाटप व ठेवी यांचे प्रमाण किती असावे व एनपीए चा अर्थ समजावून सांगितला.

सुमारे २३६६ सभासद असलेल्या या संस्थेच्या संचालक मंडळाची ३६४ दिवस आहेत, पण एक दिवस सभासदांचा आहे.संस्थेच्या सभासदांची हक्क, कर्तव्ये व जबाबदारी असा ञिवेणी संगम सहकार कायदा २२ते ३५ आहे.
यावेळी भरतशेठ आगरवाल पतसंस्थेचे संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
संस्थेच्या ४२कोटी ४४लाख ९७ हजारांच्या ठेवी असून ३४कोटी १२लाख कर्जवाटप आहे.संस्थेने पुणे जिल्हा बँकेत व इतर बँकेत १५ कोटी १६लाख गुंतवणूक केली आहे.
संस्थेचे वसूल भागभांडवल ३कोटी दोन लाख आहे. चालू नफा १ कोटी ९५ हजार असून लाभांश वाटप १५% प्रमाणे सुमारे ४१लाख ७८हजार३१३ होणार आहे. यावेळी सूञसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वसुदा पाटील यांनी केले. मिलींद खळदकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव माजी नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तसेच आजीमाजी नगरसेवक उपस्थित होते.लोणावळा सहकारी बँकेचे संचालक भरतशेठ उर्फ साहेबराव टकले यांनी तसेच चैतन्य पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारूती साठे , उपाध्यक्ष कांताराम दळवी, अध्यक्ष ए.के.जोशी, लोणावळ्याचे पोलिसपाटील प्रकाश हारपुडे पाटील, गणपत हारपुडे यांनी पुष्पगुच्छ देवून संस्थेच्या अध्यक्षा आगरवाल यांचे अभिनंदन केले.

पतसंस्थेच्यावतीने वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.यामध्ये सभासदांना पंधरा टक्के लाभांश वाटपाची घोषणा अध्यक्षा  लता आगरवाल यांनी केली.
संचालक राजू दळवी , सुरेश गायकवाड , दत्ताञेय तांदळे ,अशोक आगरवाल, यशवंत पायगुडे, कृषिकेश लेंडघर , अनिल गायकवाड, रामविलास खंडेलवाल, संजय गायकवाड,  सुनंदा दाभाणे व दिनेश ओसवाल आणि व्यवस्थपिका वासंती खिरे आणि अधिकारी , कर्मचारी , पिग्मी एजंट  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!