आंदोलनऔद्योगिकताज्या घडामोडी

जनरल मोटर्स कामगार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला.रोहितदादा पवार यांचा पाठिंबा..

Spread the love

जनरल मोटर्स कामगार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला.रोहितदादा पवार यांचा पाठिंबा.. Rohitdada Pawar’s support for the indefinite chain hunger strike called by the General Motors labor union.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ९ सप्टेंबर.

जनरल मोटर्स कामगार संघटनेने General Motors Employees Union पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत जामखेड चे युवा आमदार मा. रोहितदादा पवार Rohit Rajendra Pawar आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले.

गेल्या सात दिवसापासून संपूर्ण परिवारासह उपोषणाला बसलेल्या कामगारांच्या हाताला काम नसल्याने दैनंदिन अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

जनरल मोटर्स कामगारांचा लढा हा रास्त असून मी तुमच्या पाठीशी आहे. कोणतीही कंपनी येत असताना सरकारने सर्वांगीण विचार केला पाहिजे. संविधानिक लढ्यातील व्यवस्थापना सोबतचा ॲग्रीमेंट मुद्दा हा तुमच्या बाजूने निर्णय कौल देणार असेल या आंदोलनातून जे यश मिळेल ते सर्वस्वी कामगारांचे असेल, तुमच्या कुटुंबीयांचे असेल ते श्रेय कुठल्याही राजकारण्याला देऊ नका. यापूर्वी कित्येकदा जनरल मोटरचा प्रश्न संदर्भात उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांच्याशी चर्चा केली असता तुम्ही काळजी करू नका आंम्ही कामगारांना योग्य तो न्याय देऊ असा शब्द दिला गेला, पण त्यांनी तो शब्द पाळला नाही. तुमच्या या लढ्यात शंभर टक्के यश तुंम्हाला मिळेल.

कामगारांचे सर्व प्रश्न समजून कामगारांच्या न्याय हक्कासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत चर्चा करून, युवकांच्या रोजगारासाठी पुढील ४० दिवस पुणे ते नागपूर ८५० कि.मी पायी प्रवास करून अधिवेशनात विषय मांडून त्यांना पूर्णतः सहकार्याची भूमिका व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा दिला.

 

यावेळी ज्येष्ठ नेते मंगेश काका ढोरे, पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल अतुल राऊत, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष आफताब सय्यद, या. नगरसेवक मंगेश खैरे, मा. उपसरपंच विशाल वहिले, मावळ तालुका उपाध्यक्ष सुनिल शिंदे, तळेगांव शहर युवक अध्यक्ष आशिष खांडगे, वरिष्ठ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, मयुर गुरव, पप्पू सावले, पंकज भामरे, प्रणव ढोरे, राहील तांबोळी, केदार बवरे आदी मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!