सामाजिक

पाण्याचा अंदाज आला नसल्याने २ युवकांचा, लोणावळा लेकमध्ये बुडुन मृत्यू.

बाहेर कुठेही पाण्याचा अंदाज नसेल तर पाण्यात उतरु नका. सूनिल गायकवाड.

Spread the love

पाण्याचा अंदाज आला नसल्याने २ युवकांचा लोणावळा लेकमध्ये बुडुन मृत्यू ; बाहेर कुठेही पाण्याचा अंदाज नसेल तर पाण्यात उतरु नका. सूनिल गायकवाड.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ९ ऑक्टोबर.

काल दुपारी दोनच्या सुमारास तिन युवक लोणावळा लेक जवळ गेले होते त्यापैकी दोघे पोहत असताना बुडाले.
मुळचे नेपाळचे असलेले ह्या युवकांना माहिती नव्हती की या पाण्यामध्ये खोल डक्ट लाईन आहे. त्यामुळे पाण्याचा अंदाज आला नाही व ते बुडाले, व त्यांचा अंत झाला. विवेक छत्री 21 वर्ष ओळकाईवाडी व करण कुंवर 20 वर्ष ओळकाईवाडी अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

बाहेर कुठेही पाण्याचा अंदाज नसेल तर पाण्यात उतरु नका असे आवाहन सुनिल गायकवाड यांनी केले आहे.

बचाव कार्यात पोलीस कर्मचारी शिंदे साहेब यांनी टिमबरोबर शोधकार्य केले. तसेच महादेव भवर असे दोन नवीन चांगले स्विमर आपल्याला लाभले आहेत.पहिली बॉडी महादेव भाऊ भवर यांनी शोधून काढली .स्कुबा डायव्हिंग करुन काही मिनिटांतच महेशभाऊ मसने यांनी दुसरी बॉडी रिकवर केलीसाडे पाच वाजता शोध कार्य संपले.

अजय शेलार, महेश मसने, सागर कुंभार, मनोहर ढाकोल, राजेन्द्र कडु, प्रणय अंबुरे, अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, अमोल परचंड, अनिकेत आंबेकर, अमोल सुतार, दक्ष काटकर, आयुष वर्तक, दुर्वेश साठे, महादेव भवर, रतन सिंह, अशोक उंबरे, सुनील गायकवाड़, ब्रिजेश ठाकुर, मयुर दळवी, साहिल भिकोले, निहाल दळवी, आकाश घरदाळे, कैलास दाभणे, दिंपाशु तिवारी,वैभव दुर्गे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!