निधनवार्तामावळ

आदर्श शिक्षिका कै‌.संध्या नाखरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

अंत्ययात्रा आज रविवार दिनांक ०८/१०/२३, सकाळी १०.३० वाजता राहत्या घरापासून निघेल.

Spread the love

कै.संध्या नाखरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन ; अंत्ययात्रा आज रविवार दिनांक ०८/१०/२३, सकाळी १०.३० वाजता राहत्या घरापासून निघेल.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ८ ऑक्टोबर.

मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते  सुहास राव तथा राजाभाऊ नाखरे काका यांच्या पत्नी आणि   समीर व सचिन नाखरे यांच्या मातोश्री  शिक्षिका कै‌.संध्या नाखरे मॅडम यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.अंत्ययात्रा आज रविवार दिनांक ०८/१०/२३, सकाळी १०.३० वाजता राहत्या घरापासून निघेल.

नाखरे मॅडम म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांना घडविण्यात घालवले. त्यांनी  कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार दिले. केवळ शालेय शिक्षण न देता  बाल मनावर त्या काळी आयुष्य कसे जगावे हे शिकविले,चांगले सुसंस्कृत आणि सुशिक्षित विद्यार्थी घडवले. त्याचबरोबर संघ कार्यात स्वतःला झोकून दिले.

लहानपणापासून मॅडम यांच्या चेहऱ्यावर  कायम हास्य आणि आपल्या विशिष्ट शैलीने शिकविण्याची कला आजही लक्षात आहे.तसं म्हणाल तर आपल्या तळेगाव दाभाडे नगरीचे एक रत्न आपण गमावले आहे.आज बाईंच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो आणि त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आवाज न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..
शोकाकुल.. 
सुहास राव तथा राजाभाऊ नाखरे काका.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!